आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🛑 शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि दासबोध नको ; जिजाऊ ब्रिगेडची एकमुखी मागणी

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴 चिपळूण, दि-३१:- महाराष्ट्र शासनाच्या शाळांमध्ये मनुस्मृति आणि रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील श्लोकांचा समावेश करण्यात आल्याची बातमी महाराष्ट्रभर पसरली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि दासबोधाचा समावेश करून सरकारला विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यायचे आहे असा प्रश्न सर्व स्तरातून विचारला जात असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागावर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. मनुस्मृति हा हिंदू धर्मातील समस्त बहुजन समाजाचा अपमान करणारा आणि त्यांना हीन लेखनारा ग्रंथ आहे. तसेच मनुस्मृतीने हिंदू धर्मातील समस्त स्त्रियांना जनावरापेक्षाही खालचा दर्जा दिलेला असून स्त्रियांना सर्व प्रकारचे हक्क आणि अधिकार नाकारले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांना सुद्धा मनुस्मृतीचा आधार घेऊनच प्रचंड विरोध झालेला आहे.सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक कार्याला सुद्धा मनुस्मृतीचा आधार घेऊनच प्रतिगाम्यांनी विरोध केलेला होता. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन रायगडाच्या पायथ्याशी महाडला मनुस्मृतीचे जाहीर दहन केले होते.

अशा विषमतावादी ग्रंथातील श्लोक विद्यार्थ्यांना शिकवून त्यांच्या मनात जातीयवाद आणि विषमता सरकारला निर्माण करायची आहे का ? तसेच रामदास स्वामीचा ‘दासबोध’ हा ग्रंथ सुद्धा विषमता निर्माण करणारा असून त्या ग्रंथांमध्ये ‘गुरूंची लक्षणे’ या अध्यायात बहुजन समाजाला अध्ययन आणि अध्यापन करण्याचा अधिकार नाकारलेला आहे. तसेच बहुजन समाजातील कोणीही व्यक्ती शिक्षक होऊ शकत नाही, फक्त ब्राह्मण समाजातील व्यक्तींनाच शिक्षक होण्याचा अधिकार आहे असे रामदास स्वामी यांनी स्पष्टपणे म्हटलेले आहे. त्यामुळे आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने या दोन्ही ग्रंथांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याला जाहीर विरोध करीत आहोत.त्याऐवजी भारताची राज्यघटना अभ्यासक्रमात समाविष्ट करून दरवर्षी राज्यघटनेचे वेगवेगळे भाग विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावे अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर तुकोबांची अभंगगाथा, राष्ट्रसंतांची ग्रामगीता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट करावे अशी आमची सरकारला जाहीर मागणी आहे.सरकारने आमच्या मागणीचा ताबडतोब विचार करून अभ्यासक्रमातून मनुस्मृति आणि दासबोध ताबडतोब हटवावे.अन्यथा जिजाऊ ब्रिगेडला शिक्षण विभागावर मोर्चा नेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभे करावे लागेल.हे निवेदन नायब तहसीलदार माननीय श्री समीर देसाई ह्यांना देताना रत्नागिरी जिल्हा(चिपळूण )जिजाऊ ब्रिगेड च्या महिला उपस्तित होत्या.त्यावेळी कोकण उपाध्यक्ष मालती ताई पवार.मुंबई कोकण विभागीय कार्याध्यक्ष निर्मलाताई जाधव मुंबई रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष स्नेहल चव्हाण. रत्नागिरी जिल्हा कार्य अध्यक्ष रविना गुजर.तालुका अध्यक्ष मीनल गुरव. शहर सचिव संध्या संध्या घाडगे पूर्वा अहिरे . सीमा ताई चाळके. रोहिणी मोरे इ महिला नी निवेदन देण्यासाठी उपस्थित होत्या.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!