कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

आंबोली वृक्षतोडप्रकरणी वन अधिकाऱ्यांविरोधात तक्रार

*🛑आंबोली वृक्षतोडप्रकरणी वन अधिकाऱ्यांविरोधात तक्रार*

*🛑दखल न घेतल्यास उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार – अॅड. जावेद सय्यद*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्ग, दि-३१*:-शासकीय मालकीच्या वनजमिनीतील दुर्मीळ वृक्षांची बेकायदेशीर तोड करून वाहतुक केल्याप्रकरणी आंबोली वनपरिक्षेत्रीय अधिकारी श्रीमती व्ही. ए. घोडके यांच्यासह या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी, अशी तक्रार सावंतवाडी येथील अॅड. जावेद सय्यद यांनी जिल्हा उपवनसंरक्षक व सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे.आंबोली मलईपठार परिसरातील वनखात्याच्या मालकीच्या संरक्षित वनक्षेत्रामध्ये रस्ता तयार करण्याच्या नावाखाली बेकायदेशीरपणे जे.सी.बी. लावून जी वृक्षतोड करण्यात आली, त्याबाबत ‘तरुण भारत संवाद मधून आवाज उठविल्यानंतर पर्यावरणप्रेमी व निसर्ग अभ्यासकांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. मात्र, वनखात्याने हे प्रकरण थंड करून मिटविण्याचा प्रयत्न चालवला असतानाच सावंतवाडी येथील अॅड. जावेद सय्यद यांनी या प्रकरणी तक्रार दाखल करत घेट वनखात्यालाच आव्हान दिले आहे.अॅड. सय्यद यांनी पोलीस व वनखात्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आंबोलीतील शासकीय मालकीच्या वरील जंगल क्षेत्रात जी बेकायदेशीर तोड झाली त्याबद्दल दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सदरचे कृत्य हे भारतीय वनकायदा १९२७ व महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ अन्वये दखलपात्र गुन्हा आहे. तसेच भारतीय दंडविधान कलम ३७९, ४०८, ४०९, ४२५, ४२६ आणि ४२७ अन्वयेदेखील हा दखलपात्र गुन्हा आहे. वनपरिक्षेत्रपाल शासनाने नियुक्त केलेला अधिकारी असून वैनांचे संरक्षण व संवर्धन करणे हे त्यांचे प्रमुख कर्तव्य आहे असे असताना त्यांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील वनक्षेत्रातील दुर्मीळ व मौल्यवान झाडे जे.सी.बी.द्वारे तोड केल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये शासनाचा म्हणजे मालकाचा विश्वासघात करून फसवणूक करण्यासारखे हे कृत्य आहे. सदर कृत्य भा. दं. वि. कलमानुसार गुन्हा आहे. तसेच बेकायदेशीर तोड केलेली झाडे अनधिकृतपणे जागेवरून हलवून गायब करणे हादेखील गंभीर गुन्हा वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती घोटगे यांनी केलेला हा गुन्हा हा मानवतेविरुद्ध देखील अपराध आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलीस व वनखात्याने गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी करावी. यातील दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी अॅड. सय्यद यांनी केली आहे.दरम्यान, बेकायदेशीर वृक्ष तोडल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल होऊ शकते का, याबाबत अॅड. सय्यद यांना विचारले असता जम्मू-काश्मिर उच्च न्यायालयातील एका निकालाचा संदर्भ देत ते म्हणाले की, पोलीस खात्याला वन गुन्हे दाखल करण्याचा आणि त्या अनुषंगाने तपास करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या खटल्याच्या निकालाची प्रतदेखील आपल्या तक्रारीसोबत पोलिसांच्या संदर्भासाठी जोडल्याचे ते म्हणाले. आपण तक्रार देण्यासाठी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गेलो होतो. मात्र, तेथील पोलीस अंमलदाराने तक्रार घेण्यास नकार दिला. ही बाब बेकायदेशीर असून तक्रार नाकारणाऱ्या अंमलदाराची चौकशी व्हावी, अशी मागणी आपण केली. त्याचबरोबर रजिस्टर एडीद्वारे ही तक्रार सावंतवाडी पोलिसांत नोंदवल्याचे स्पष्ट केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!