प्रीपेड मीटरचे धोरण अन्यायकारक !
*🛑प्रीपेड मीटरचे धोरण अन्यायकारक !*
*🛑वीज वितरणविरोधात जनआंदोलन उभारणार- अॅड. संदीप निंबाळकर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२९*:-शासनाचे प्रीपेड वीज मीटर बसविण्याचे धोरण आहे. प्रीपेड मी तर बसवण्याचा ठेका काही कंपन्यांना देण्यात आला आहे. लवकरच हे मीटर जिल्हयात बसवण्यात येणार आहे. हे प्रीपेड मीटरचे धोरण गरीब जनतेवर अन्याय करणारे ठरणार आहे. त्यामुळे या शासनाच्या धोरणाला जनतेने संघटितपणे विरोध करून हे धोरण रद्द करण्यात भाग पडले पाहिजे. यासाठी लवकरच जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या बैठका घेऊन जनआंदोलन उभारण्यात येईल, असे माहिती याचे अॅड. संदीप निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.निंबाळकर पुढे म्हणाले, सध्या ग्राहकांकडे वीज मीटर आहेत. परंतु, हे प्रीपेड वीज मीटर पोस्टपेडमध्ये रुपांतरित करण्यात येणार आहे. वीज ग्राहकांना आता प्रीपेड व पोस्टपेड मीटर देण्यात येणार आहेत. या मीटरची किंमत १३ हजार रुपये असून सात टक्के हिस्सा केंद्राचा व ४० टक्के हिस्सा महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचा असणार आहे. राज्यात वीज वितरणचे दोन कोटी २० लाख इतके ग्राहक आहेत. त्यामुळे महावितरणला सोळा हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. वीज मीटर ग्राहकांना मोफत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी महावितरण कंपनी महावितरण कंपनी हा पैसा बिलातूनच टप्याटप्प्याने वसूल करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक बोजा भविष्यात सहन करावा लागेल. प्रीपेड मीटरला मोबाईल रिचार्जप्रमाणे चार्च करावे लागणार आहे. ग्राहकाला जेवढे वीज आवश्यक आहे. तेवढी इमेज तो रिचार्ज करून वापरू शकतो. परंतु, यामध्ये अनेक अडचणी येणार आहेत. गरीब जनतेला हे प्रीपेड मीटर परवडणारे नाहीत. कारण रिचार्जचे पैसे असेपर्यंतच वीज वापरता येणार आहे. अन्यथा रिचार्ज संपल्यास वीज कनेक्शन बंद पडणार आहे. असेच ग्राहक पैसे असतील तेच ग्राहक रिचार्ज खरेदी करू शकतात. अन्यथा अशा ग्राहकांना काळोखात राहण्याची वेळ येऊ शकते. प्रीपेड मीटरमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येणार आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणाला जनतेने संघटितपणे विरोध केला पाहिजे, असे निंबाळकर म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
