विलवडे शाळा नं.१ च्या संरक्षण भितींला डप्परची धडक
विलवडे शाळा नं.१ च्या संरक्षण भितींला डप्परची धडक;
विलवडेत अपघातचे सत्र सुरुच
वेगाची मर्यादा न पाळण्याने अपघात सरपंच प्रकाश दळवी
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
बांदा दाणोली जिल्हामार्गावर विलवडेत अपघातचे सत्र सुरुच आहे.विलवडे १ च्या शाळेच्या संरक्षण भितीला डप्परने धडक दिल्याने संरक्षण भिंत पडून मोठे नुकसान झाले.सुदैवाने या अपघातात चालक बालंबाल बचावला. ट्रकचे मोठे नुकसान झाले.
हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास झाला. बांदा-दाणोली रस्त्यांचे डांबरीकरण झाल्याने वाहन चालक सुसाट वेगात जात आहेत.वेग मर्यादा नियत्रंणात नसल्याने हा अपघात झाल्याचे विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी सांगितले.
शुक्रवारी सायंकाळी डप्पर चालक विलवडे मार्गे बांद्यांच्या दिशेने काळ दगड डस्ट घेऊन जात होता.जिल्हा परिषद पुर्ण प्रार्थमिक शाळा विलवडे नं.१ शाळेसमोर चालकाचा ताबा सुटून संरक्षण भिंतीला डप्परची मोठी धडक दिल्याने दगडी सरंक्षण भिंती कोसळून जमिनदोस्त झाली.शाळेचे मोठे नुकसान झाले.
सरपंच प्रकाश दळवी यांनी मध्यस्थी करत डप्पर मालकाने दगड सरंक्षण भिंत बांधून देणार असल्याने आपआपसांत हे प्रकरण मिटविण्यात आले. अपघाताची नोंद बांदा पोलिसात करण्यात आली नाही.
बांदा-दाणोली जिल्हामार्गा हा खड्डेमुक्त झाला असला तरी काही ठिकाणी रस्ता अरुंद व वळणावळणाचा,सहा गाव,अनेक शाळा आहेत.तसेच खडी वाहतूक करणारे डंपर, मालवाहतूक करणारे ट्रक,अवजड वाहने, यामुळे हा मार्ग अपघाताला नेहमीच निमत्रंण देत आहे.रस्त्यावर साईड पट्ट्यांवर सफेद पट्टे मारणे,गतिरोधक असलेल्या ठिकाणी रिफ्लेक्टर्स लावणे, आवश्यक त्या ठिकाणी रंबल्स लावणे, दिशादर्शक,वेग मर्यादा फलक लावणे अत्यआवश्यक आहे.

