दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान ;लाखो रुपयांचे नुकसान
वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळलेल्या पावसाने दोडामार्ग तालुक्यात आज हाहाकार माजवीला.तालुक्यात ठिकठिकाणी वीज वाहक तारांवर झाडे उन्मळून पडल्याने लाखो रुपयांची हानी झाली.मणेरी येथे घरांवर तसेच अनंत गाड यांच्या चाकी गाडीवर झाड पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.तसेच विद्युत पोल उन्मळून पडल्याने दोडामार्ग तालुक्यातील वीजपुरवठा देखील खंडीत झाला आहे.आज सायंकाळी दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले.काही ठिकाणी वीज कोसळल्याने उपकरणे निकामी झालीत.त्यामुळे नुकसान झालेल्या भागाची तात्काळ पहाणी करुन घ्यावी व पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस यांनी केली आहे.

