कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

कोकणच्या विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान !

*🛑कोकणच्या विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२२*:-बारावी परीक्षेत यावर्षीही कोकण विभागाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. याबद्दल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कोकणच्या यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.केसरकर यावेळी म्हणाले, बारावीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश संपादन केलं आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. सातत्याने महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकांने उत्तीर्ण होण्याची टक्केवारी कोकणच्या मुलांनी यावर्षीही कायम ठेवली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांमुळे हे शक्य होऊ शकते. त्याचप्रमाणे विद्यार्थांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुवर्यांचेही अभिनंदन करावे तेवढं थोडं आहे. संस्थाचालक देखील हा निकाल कायम ठेवण्यासाठी मेहनत घेत असतात. सर्वांच्या परिश्रमाने हे यश संपादित करता येते. सिंधुदुर्गसह शेजारील रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी देखील देदिप्यमान यश मिळवले आहे. राज्याचा शिक्षणमंत्री व कोकणचा सुपुत्र म्हणून कोकणच्या विद्यार्थ्यांचा मला सार्थ अभिमान आहे. ज्या मोजक्या मुलांना अपयश आलं अशांनी निराश होऊ नये. अपयश आलेल्या व कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात पुन्हा परीक्षेस बसता येणार आहे. त्यांनी खचून न जाता. या संधीचा लाभ घ्यावा. मेहनतीन यश संपादन करत चांगले गुण प्राप्त करावेत, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केल. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत जीवनात चांगल्या संध्या मिळाव्यात, अशा शुभेच्छा दिल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!