सावंतवाडीत बंदिवानांसाठी आरोग्य तपासणी शिबीर
*🛑सावंतवाडीत बंदिवानांसाठी आरोग्य तपासणी शिबीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे, दि-२०*:-सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानतर्फे सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदिवानांसाठी प्रतिष्ठानतर्फे निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तुरुंगातील बंदिवानांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधेही देण्यात आली. यावेळी सर्वांची रक्तातील साखरेचीही तपासणी करण्यात आली.या शिबिरात शल्य चिकित्सक डॉ. शंकर सावंत, नेत्र रोगतज्ज्ञ डॉ. विशाल पाटील, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, डॉ. चेतन परब यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी कारागृहात निःशुल्क निदान व चिकित्सा सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल कारागृह अधीक्षक संदीप एकशिंगे यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.तुरुंगाधिकारी संजय मयेकर यांनी कारागृह येथे आरोग्य शिबीर आयोजित केल्याबद्दल सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले. शिबिराचे नियोजन सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते भार्गवराम शिरोडकर, अँड्र्यू फर्नांडिस, भगवान रेडकर, नितीन गोंडगिरे, सिद्धेश मणेरीकर, दीपक गावकर यांनी केले. यासाठी कारागृहातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सिंधुमित्र प्रतिष्ठानतर्फे यापूर्वी सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथे अनेक उपक्रम बंदिवान बंधू-भगिनींसाठी राबविले आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

