नुकसानग्रस्तांना तौक्तेच्या धर्तीवर जास्त मदत द्या !
*🛑 नुकसानग्रस्तांना तौक्तेच्या धर्तीवर जास्त मदत द्या !*
*🛑 शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांची मागणी : अन्यथा आंदोलन छेडणार!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१८*:-तालुक्यात हरकुळ बुद्रुकसह हळवल, कळसुली, शिरवल व इतर भागात आलेल्या चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. या वादळामुळे जी घरे, आंबा, काजू कलमे बाधित झालेली आहेत, त्यांना तौक्तेच्या धर्तीवर त्यापेक्षा अधिक भरपाई मिळावी. येत्या चार-पाच दिवसांत प्रशासनाने ही भरपाई देण्यासाठीची कार्यवाही करावी अन्यथा बाधित लोकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी दिला.येथील विजयभवनमध्ये पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी हरकुळ बुद्रुक सरपंच आनंद ठाकुर, नित्यानंद चिंदरकर उपस्थित होते. या वादळात एकट्या हरकुळ बुद्रुकमधील ७५ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून तातडीने पंचनामे सुरू करण्यात आले आहे. शिवाय तालुक्यातील हळवल, कळसुली, शिवडाव, शिरवल व इतर भागातही मोठे नुकसान झाले आहे. यावेळी कोणतेही वादळ घोषित नव्हते. तरीही अचानक आलेल्या या वादळात जे नुकसान झाले आहे, त्यांना १७ मे २०२१ च्या तौक्ते वादळासंदर्भातील शासन निर्णयाच्या धर्तीवर त्यापेक्षा जास्त दराने मदत करावी, अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचे सावंत यांनी सांगितले. यावेळी प्रशासनाकडून पंचनामे सुरू असून पंचनामे पूर्ण होताच तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून भरपाईची मागणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे सावंत. म्हणाले. दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनी
घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी, तर खासदार विनायक राऊत यांनी प्रधान सचिवांशी चर्चा केली. या सर्व बाधितांना तौक्तेपेक्षा जास्त दराने भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली. या सर्व बाधितांना शासनाने चार-पाच दिवसांत भरपाई देत, त्यांची घरे उभी करण्यास मदत करावी, अशी मागणी सावंत यांनी केली. हे सर्व शेतकरी असून त्यांनी पावसाळापूर्व घरांची कामे केलेली होती. मात्र, अचानक आलेल्या वादळामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून व सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही सावंत यांनी केले.आपद्ग्रस्तांना मदत करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून पत्रे व कौले आम्ही पोहोच करणार आहोत, असेही सावंत म्हणाले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

