कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

कुणकेरी गावाला स्वतंत्र नळपाणी योजना द्या ग्रामस्थांची मागणी

*🛑 कुणकेरी गावाला स्वतंत्र नळपाणी योजना द्या ग्रामस्थांची मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१७*:-कुणकेरी गावासाठी सावंतवाडी पालिकेच्या
पाळणेकोंड धरणावरुन स्वतंत्र नळपाणी योजना देण्यात यावी, या मागणीसाठी २७ मे ला सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा कुणकेरी ग्रामस्थांनी प्रांताधिकारी हेमंत निकम यांना दिला आहे.दरम्यान आमच्या गावात धरण असताना आम्हाला सावंतवाडी पालिकेवर अवलंबून रहावे लागते. वारंवार पाण्याची दर वाढ केली जाते ती परवडणारी नसते, त्यामुळे याबाबत तात्काळ सकारात्मक भूमिका घ्या, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, कुणकेरी गावामध्ये सुमारे ४० वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पिण्याच्या पाण्यासाठी पाळणेकोंड या ठिकाणी धरण बांधले आहे. हे धरण ज्या वहाळावर बांधले आहे तो वहाळ कुणकेरी गावच्या शेतशिवारातून बारमाही वाहत होता. या वहाळाच्या पाण्यावर कुणकेरी गावच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजाही भागत होत्या. पाळणेकोंड धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पडणारा पाऊस या धरणात अडवला जात असल्याने पूर्वी बारमाही वाहणारा ओहळ कोरडा पडला. गावातील विहिरींचे पाणीही आटले. अशी एक नवी आपत्ती पाळणेकोंड धरणामुळे कुणकेरी गावावर ओढवली. खरतर हे धरण मुळात कुणकेरी गावच्या हद्दीत आणि इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर बांधले आहे. पिढ्यानपिढ्या या परिसरात पडणारा या धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील पाऊस हाच या गावच्या शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत होता. त्यामुळे या धरणातील पाण्यावर कुणकेरी गावचा प्रथम अधिकार असतांना मे १९९९ ला सावंतवाडी नगरपालिका आणि महारष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे संपूर्ण नळ पाणीपुरवठा योजना सावंतवाडी नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे, आणि आम्हा सर्व कुणकेरी ग्रामस्थांना सावंतवाडी नगरपालिकेच्या दयेवर सोडण्यात आले. या धरणाच्या पाण्यावर प्रथम हक्क आमचा असतांना आम्हाला या करारानंतर सावंतवाडी नगरपालिकेवर अवलंबून रहावे लागत आहे.त्यामुळे नगरपालिका मनमानी पद्धतीने पाण्याचे दर वाढवत आहे. याबाबत पत्रव्यवहार करूनही पालिका साधा खुलासाही ग्रामपंचायतीला देत नाही. त्यामुळे आम्हाला आता सावंतवाडी नगरपालिकेवर अवलंबून राहायचे नाही. केंद्र आणि राज्य सरकारने जलजीवन योजनेअंतर्गत प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे आवश्यक तितके पाणी देण्याचे आश्वासित केले आहे. त्यानुसार आम्हाला पाळणेकोंड धरणातून गावासाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना तातडीने मंजूर द्यावी अन्यथा २७ मे ला श्रमिक मुक्ती दलाचे राज्यकार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई आणि सत्यशोधकचे अंकुश कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आंदोलन करण्यात येईल असे यात म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!