राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनांमध्ये उपक्रमशील शिक्षक दीपक डावर प्रथम..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.०३: अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय जिज्ञासा विज्ञान प्रदर्शनामध्ये उपक्रमशील शिक्षक दिपक तानाजी डवर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिक्षक दिपक डवर हे पूर्ण प्राथमिक शाळा सौंदाळे बाऊळवाडी ता. देवगड याठिकाणी ते कार्यरत आहेत. शिक्षक दीपक डवर यांनी सर्वोत्तम शैक्षणिक साधन निर्मिती यात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. सलग दुसऱ्या वर्षी राज्य विज्ञान प्रदर्शनांमध्ये क्रमांक मिळविल्यामुळे त्यांची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. डिजिटल कृतीयुक्त शिक्षण या त्यांच्या संकल्पनेला मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. शैक्षणिक साधनांमध्ये डिजिटल कृतींचा समावेश करून कोरोना महामारीच्या काळातदेखील प्रभावी ठरलेले हे साधन कोठेही आणि केव्हाही वापरता येणारे आहे. हे शैक्षणिक साधन मोफत तसेच कोणत्याही खर्चा शिवाय तयार केलेले साधन आहे. त्यांच्या या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक तुषार अवटी, तोळाराम पोवार, मुख्याध्यापिका सुनीता भोसले, केंद्रप्रमुख अशोक जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण मोंडे, माजी पंचायत समिति सदस्य प्रकाश गुरव, सरपंच सायली मिठबावकर, उपसरपंच मुकेश गुरव, अशोक मोरये, उपाध्यक्ष दिपक कामतेकर, तसेच व्यवस्थापन समिती सदस्य, पालक यांनी या उपक्रमाला स्वतःचा समजून सहकार्य केल्यामुळे तो शंभर टक्के यशस्वी ठरला आहे. या बद्दल शिक्षक श्री. डवर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

