कोकणमहाराष्ट्रसामाजिक

गौतम बुद्धांचे अनेक विचार माणसाला दुःखातून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त :आनंद कासार्डेकर

*🛑गौतम बुद्धांचे अनेक विचार माणसाला दुःखातून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त :आनंद कासार्डेकर*

*🛑कासार्डे कदमवाडीत संयुक्त जयंती महोत्सव व महाबोधी बुध्दविहार ५ वा वर्धापन उत्साहात साजरा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴तळेरे, दि-१६*:-शील, समाधी आणि प्रज्ञा ही भगवान बुद्धांची शिकवण आचरणात आणावी,ध्यान करणाऱ्या माणसांचं मनही शांत राहते, बौद्ध धर्मातील अनेक तत्वे माणसाला दुःखातून दूर करण्याचे काम करतात.आजही समाज गटातटात विभागला गेला आहे त्यामुळे समाजाची शक्ती नको त्या ठिकाणी खर्च होत, अशी खंत भारतीय बौद्ध महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी कासार्डे -कदमवाडी येथील कार्यक्रमात व्यक्त केली.
बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा (रजि) शाखा- कासार्डे कदमवाडीच्यावतीने संयुक्त जयंती महोत्सव व महाबोधी बुद्ध विहार वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय भिकाजी कदम,कासार्डे ग्रा.प.सदस्य विजय राणे ,ग्रा.प. सदस्या सौ.श्रद्धा शेलार,दै.पुढारीचे पत्रकार तथा कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,माजी ग्रा.प.
सदस्य अशोक पांचाळ, तसेच फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच ओरोसचे सचिव आर.टी कदम,स्वप्निल वनकर,शरद शेलार,महेंद्र जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थितीत होते.
प्रारंभी संयुक्त जयंती महोत्सवाचे औचित्य साधून कासार्डे कदमवाडी येथील बुध्द विहारात भगवान गौतम बुद्ध,छ.शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला आनंद कासार्डेकर,विजय भि. कदम,दत्तात्रय मारकड,सौ.शेलार ,श्री. राणे व आर.टी.कदम या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय कदम यांनी करुन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
दरम्यान सत्कारमुर्ती तथा पत्रकार दत्तात्रय मारकड यांनी संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आपले मनोगत व्यक्त करताना संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या .

*विशेष मान्यवराचा सन्मान…..*
कासार्डे गावचे सुपुत्र व बौध्द धर्माचे विचारवंत, प्रख्यात प्रवचनकार,सामाजिक कार्यकर्ते यांच्या आतापर्यंत उत्कृष्ट बौध्द धर्मसेवेबद्दल धार्मिक व सामाजिक कार्याबद्दल आनंद कासार्डेकर यांचा तसेच पत्रकारिता क्षेत्रातील २३ वर्षाच्या उत्तम योगदानाबद्दल,अनेक वंचितांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवून न्याय मिळवून दिल्याबद्दल तसेच क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल दै.पुढारीचे कासार्डेतील पत्रकार तथा कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड या मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी सन्मानचिन्ह,भारतीय संविधानाची प्रत,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
………………………………
याशिवाय अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा आणि विशेष व्यक्तींचाही याप्रसंगी शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कदम यांनी केले.
तत्पूर्वी सकाळी सत्रात शाखेचे अध्यक्ष विजय भिकाजी कदम यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करून संयुक्त जयंती महोत्सवाचा प्रारंभ झाला.त्यानंतर बुध्द पुजापाठ करण्यात आले.दुपारच्या सत्रात महिलांसाठी व लहान मुलांसाठी फनिगेम्स घेण्यात आले.सायं.५ वा मोठ्या उत्साहात धम्मरॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत लहान- थोरापासून ते वयोवृद्ध पुरुष महिलापर्यंत सर्वांचा मोठा सहभाग होता.

*गुणवंत व विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव…*
रात्रीच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डेच्यावतीने विविध मान्यवरांच्या हस्ते कदमवाडीतील विविध स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केलेले विद्यार्थी तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते छोटीशी भेट वस्तू देऊन गुणगौरव करीत कौतुक करण्यात आले.
………………………………..

त्यानंतर‌ मालवण कलांकूर‌ ग्रुपचा ‘ मराठी अस्मितेच्या पाऊलखुणा ‘ व वसुंधरा कदम यांचे बहारदार नृत्याचा कार्यक्रम पहाटे ३वा. संपन्न झाला.संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर तांबे, सुहास तांबे, विशाल कदम, योगेश कदम, अजय कदम, चैतन्या तांबे, योगिनी कदम, बबन तांबे, राहुल कदम, सुनील कासले, अमिषा कदम, रूपाली कदम, सुचिता कासले, स्मिता कदम, यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी शाखेचे सचिव योगेश कदम यांनी आभार मानून महोत्सवाची सांगता केली.संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितींना मार्गदर्शन करताना जिल्हा अध्यक्ष आनंद कासार्डेकर व्यासपीठावर सोबत, भि.कदम, पत्रकार दत्तात्रय मारकड,ग्रा.प.सदस्य विजय राणे,सौ.श्रध्दा शेलार ,
आर.टी.कदम, व अन्य मान्यवर
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!