मतांसाठी पैसे वाटणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा !
*🛑मतांसाठी पैसे वाटणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा !*
*🛑आमदार नाईक यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१६*:-लोकसभा निवडणुकीमध्ये मतांसाठी पैसे वाटप केल्याप्रकरणी उमेदवार व कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार वैभव नाईक व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी स्वतंत्ररित्या केली आहे. नाईक यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे, तर उपरकर यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली असून दोघांनीही तक्रारीसोबत तालुक्यातील एक व्हीडिओही पाठविला आहे.वैभव नाईक यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे, ७ मे २०२४ रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली. मात्र, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावात मतदारांना पैसे वाटप झाल्याचे निदर्शनास आले. या संदर्भातील पुराव्यासाठी फोंडाघाट येथील भाजप कार्यकर्ता पैसे वाटप करतानाचा व्हीडियो आपल्याला पाठवित आहे. पैसे देताना हे पैसे राणे यांनीच दिले आहेत, असे मतदाराला सांगण्यात आले आहे. या संदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, असे म्हटले आहे.परशुराम उपरकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केलेल्या अर्जात म्हटले आहे, आम्हाला मिळालेला व्हीडिओ पुराव्यांनुसार आणि तुम्हाला ते फॉरवर्ड करत आहे. त्यावरून असे दिसून येते, की भाजपचे उमेदवार उघडपणे मतदारांना लाच देत आहेत आणि आपल्याच उमेदवारांना मत देण्यासाठी धमकावत आहेत. या व्हीडिओनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे ही तक्रार स्वीकारा आणि उमेदवार आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

