कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

माजगावला कायमस्वरुपी वायरमन मिळावा !

*🛑माजगावला कायमस्वरुपी वायरमन मिळावा !*

*🛑अन्यथा उपोषण-चंद्रकांत कासार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१४*:-शनिवारी अचानक झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे माजगावातील वीजपुरवठा खंडित झाला. पाच तासाहून अधिक वेळ ग्राहकांना अंधारात राहाण्याची वेळ आली. माजगावसाठी वीज वितरण कंपनीने कंत्राटी पद्धतीने वायरमन असल्याने रात्रीच्यावेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास हे कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी येत्या आठ दिवसात माजगावसाठी कायमस्वरूपी वायरमन नियुक्ती करावी, अन्यथा वीज वितरण कंपनीच्या सावंतवाडी कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा उबाठा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार यानी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे. शनिवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावताच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडला. शहरापासून तीन किलोमीटरवर असलेल्या माजगावमध्ये वीजपुरवठा रात्री सात वाजता खंडित झाला. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी वायरमन नसल्याने माजगावला रात्र अंधारात काढावी लागली. उद्ममनगरात उद्योग बंद ठेवण्याची वेळ आली. दोन तास उलटून गेले तरी वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रकांत कासार यानी माजगाव सबस्टेशन येथे जात तेथील अधिकाऱ्याकडून माहिती घेतली. कायमस्वरूपी वायरमन नसल्याने खंडित झालेला वीज फॉल्ट शोधून काढणे आता शक्य नसल्याचे सांगण्यात आले.वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे माजगाव गावोवर अन्याय होत आहे, असे कासार म्हणाले. जर आठ दिवसात कायमस्वरूपी वायरमन मिळाला नाही तर उबाठा शिवसेनेतर्फे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषण छेडणार असल्याचा इशारा चंद्रकांत कासार यांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!