कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर अंतरीम जामीन मंजूर

*🛑दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर अंतरीम जामीन मंजूर*

*🛑हा लोकशाहीचा विजय, सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन -विवेक ताम्हणकर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली,दि.१०*:-आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अरविंद केजरीवाल यांना मिळालेला जामीन म्हणजे लोकशाहीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी आज दिली. तसेच त्यांनी पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.श्री. ताम्हाणकर यांनी म्हटले की, अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत जामीन मंजूर झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीने २१ मार्चला अटक केली होती. मागील ५० दिवसांपासून ते तुरुंगात आहेत. सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल यांना हा अंतरिम जामीन सुप्रिम कोर्टाने मंजूर केला आहे.
ते म्हणाले, न्यायालयाचा निर्णय हा एक संकेत आहे की देशातील लोकशाही धोक्यात आहे. लोकसभा निवडणुकीत आपला सपशेल पराभव दिसतात ईडी सारख्या यंत्रणांचा वापर करून भाजपच्या मोदी सरकारने अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला. एका खोट्या प्रकरणांत पीएमएलओ सारखे गंभीर गुन्हे लावून एका खोट्या प्रकरणांत पीएमएलओ सारखे गंभीर गुन्हे लावून देखील अवघ्या ५० दिवसांत अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळणे ही बाब सत्याची बाजू दर्शवते. आता निवडणुकीच्या रणांगणात केजरीवाल यांच्या परिवर्तनवादी विचाराची तोफ निश्चितपणे धडाडेल आणि या देशात भाजपच्या मोदी शहांच्या हुकूमशाहीला लगाम बसेल.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!