कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

नाटळ येथे तंटामुक्त समिती अध्यक्षाला मारहाण

*🛑नाटळ येथे तंटामुक्त समिती अध्यक्षाला मारहाण*

*🛑नाटळ येथीलच तिघांवर गुन्हा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०८*:-नाटळ-खांदारवाडी येथील रहिवासी तथा नाटळचे तंटामुक्त समिती अध्यक्ष गणेश मारुती सावंत (३३) यांना मारहाण केल्याप्रकरणी खांदारवाडी येथीलच किशोर विठ्ठल परब, किरण किशोर परब, महेश महादेव खांदारे अशा नाटळ तिघांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नाटळ – पांगमवाडी येथील हनुमान मंदिरनजीक सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली असून तंटामुक्त समिती अध्यक्षपदाचा राजीनामा न दिल्याच्या रागातून संशयितांनी मारहाण केल्याचे गणेश यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार, गणेश वर्षभरापासून नाटळ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आहेत. हे पद आपल्याला मिळावे, अशी संशयित किशोर परब याची इच्छा होती. त्याने दोन महिन्यांपूर्वी गणेश यांना तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची धमकीही दिली होती. दरम्यान, सोमवारी रात्री गणेश जेवण झाल्यानंतर शतपावली करत असताना संशयित तेथे आले. त्यांनी चिव्याचा दांडा, लोखंडी सळी याने गणेश यांना मारहाण करायला सुरुवात केली. किरण गुन्हा परब याने ‘पंधरा दिवसांत राजीनामा न दिल्यास तुला जीवे ठार मारणार’ अशी धमकी दिली. या मारामारी, झटापटीत गणेश यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तुटून नुकसान झाले. तर त्यांच्या हनुवटीखाली, डाव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितांविरोधात भा. दं. वि. कलम ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!