गुजरात अहमदाबाद येथून थेट सावंतवाडी येथे मतदानासाठी …
न्यू सबनिसवाडा बिरोडकर टेंब येथील कु सुचिता गावडे हिने केले सावंतवाडीत मतदान
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरीकिने असे कर्तव्य पार पाडावे्
सावंतवाडी –
मतदान हा लोकशाहिने दिलेला मुलभूत अधिकार आहे,आपले मत कधीच वाया जाऊ देऊ नये आपले एक मत सुध्दा परिवर्तनाची नांदी ठरु शकते याच भावने पोटी न्यूसबनिसवाडा बिरोडकर टेंब येथील मुळची रहिवासी व आता नोकरी निमित्त गुजरात अहमदाबाद येथे असलेली कु सुचिता रामकृष्ण गावडे हिने थेट सावंतवाडीत येत काझीशहा बुध्दीन हाॅलमध्ये मतदान केंद्र क्रमांक १३८मध्ये मतदानाचा हक्क बजावला.
मतदान दिवशी सुट्टी असल्याने अनेक नागरिक पर्यटन सफरीला जातात व मतांची टक्केवारी घटते त्याचा लोकशाहीवर मोठा परिणाम होतो,आपले पवीत्र विकत देऊ नये व ते वायाही घालवू नये या भावनेतून आपण भारताची जबाबदार नागरीक असल्याचे कर्तव्य तिने पार पाडले,अहमदाबाद गुजरात येथून थेट सावंतवाडी गाठल्याने कु सुचिताचे कौतुक केले जात आहे.

