शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. सावंतवाडी चितारआळी येथील मतदान केंद्रावर केसरकर कुटुंबियांनी मतदानाचा अधिकार बजावला. मतदानाचा पवित्र हक्क जास्तीत जास्त लोकांनी बजावावा व लोकशाही अधिक बळकट करावी असं आवाहन मंत्री केसरकर यांनी केलं. सावंतवाडी मतदारसंघातून ७० हजारपेक्षा अधिक मताधिक्य राणेंना मिळेल. १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्यानं केंद्रीय मंत्री नारायण राणे विजय निश्चित आहे असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर, कन्या सोनाली केसरकर-वगळ, जावई सिद्धार्थ वगळ, नातू अर्जुन वगळ, माजी नगरसेवक आनंद नेवगी, शुभांगी सुकी, मनोज नाईक, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

