कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

मते विकत घेणाऱ्यांची मस्ती जिरवावीच लागेल !

*🛑 मते विकत घेणाऱ्यांची मस्ती जिरवावीच लागेल !*

*🛑 आमदार वैभव नाईक यांचे टीकास्त्र : भाजपला तडीपार करा !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०६*:-लोकसभा निवडणुकीतील संभाव्य पराभवाची नारायण राणेंना चाहुल लागल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपकडून निवडणूक काळात पैशांचे वाटप सुरु झाले आहे. सगळ्या शासकीय यंत्रणा भाजपच्याच ताब्यात असल्यामुळे दिवसाढवळ्या सर्रासपणे मतदारांना एका मताला पाचशे ते दोन हजार रुपये अशा दराने पैशांचे वाटप सुरू आहे. मात्र, कोकणातील जनता भलेही पैशाने गरीब असेल पण विकाऊ नक्कीच नाही. मतदार अशा पैशाने माजलेल्या लोकांना धडा शिकवेल, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. श्री. नाईक म्हणाले, भाजपने पन्नास-पन्नास खोके देऊन चाळीस गद्दार आमदारांना विकत घेतले होते. गद्दार आमदार विकले गेल्यामुळे आता भाजपचा समोरच्याला विकत घेण्याचा आत्मविश्वास वाढल्यामुळे थेट सरसकट मतदारांनाच विकत घेण्याचा अभूतपूर्व प्रयोग येथे केला जात आहे. धनशक्तीच्या जोरावर जनशक्तीला पराभूत करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न हाणून पाडायला हवा. या लोकसभा मतदारसंघात २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीत सरासरी ९ लाख मतदान झाले. आता ९ लाख मतदारांना सरासरी प्रत्येकी एक हजार रुपये वाटायचे झाले तर ९० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या खोके सरकारला एवढ्या रुपयांची तरतूद करणे ही फार मोठी गोष्ट नाही. ‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ हीच भाजपची निवडणुकांमधील रणनिती आहे, असा आरोप नाईक यांनी केला.सुरत येथे काँग्रेस उमेदवाराच्या सूचक म्हणून सह्या केलेल्याला भाजप उमेदवाराने एका रात्रीत पैशांनी विकत घेऊन गायब करून उमेदवाराचा निवडणूक अर्ज बाद करुन निवडणूक बिनविरोध जिंकली. मध्यप्रदेश – इंदोर येथे काँग्रेस उमेदवाराला पैसे देऊन अर्ज मागे घ्यायला लावला आणि निवडणूक एकतर्फी केली. यावरून एकंदरीतच भाजपची मानसिकता दिसून येते. त्यामुळे देशभरात भाजपच्या हुकूमशाही विरोधात जनमत तयार झाले आहे. अशाप्रकारे मतदारांना पैशाने खरेदी करून निवडणूक लढवण्यांची कीड कोकणात आली आहे. ही कीड समूळ उच्चाटन करणे ही काळाची गरज बनली आहे, असे नाईक म्हणाले.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघात भाजपचे प्रमोद जठार अवघ्या ३४ मतांनी राणे समर्थक उमेदवार रवींद्र फाटक यांचा पराभव करून विजयी झाले होते. त्या निवडणुकीत ज्यांच्याकडे पैसे वाटण्यासाठी दिले होते ते पुन्हा परत मागण्यात आले. म्हणजेच सध्या भाजपविरोधात लाट असंल्याने नारायण राणे यांचा पराभव निश्चित आहे. अशा परिस्थितीत त्यांचे पैसे वाटणाऱ्या व स्वीकारणाऱ्यांनी निवडणुकीनंतर पुन्हा हिशोब द्यावा लागू शकतो, हे ध्यानात ठेवावे. ७ मे रोजी पैसे वाटून कोकणच्या जनतेला खरेदी करू पाहणाऱ्या भाजपला कोकणातून तडीपार करा, असे आवाहन नाईक यांनी केले आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!