कुडाळकोकणमहाराष्ट्रमालवणरत्नागिरीराजकीयसिंधुदुर्ग

कुडाळ मालवण मतदारसंघातून वडिलांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी मुलाने कंबर कसली*

*कुडाळ मालवण मतदारसंघातून वडिलांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी मुलाने कंबर कसली*

*मतदारसंघात गावोगावी प्रचार सभा घेऊन निलेश राणे यांनी मतदारसंघ ढवळून काढला*

*प्रचारा दरम्यान अनेकांनी केले निलेश राणे यांच्याशी हितगुज*-

*माजी खासदार डॉ निलेश राणे जनतेत मिसळून जाणून घेतल्या समस्या*

*कुडाळ*
भाजपचे फायर ब्रँड नेते युवकांच्या गळ्यातील ताईत माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात आपल्या वडिलांच्या विजयासाठी कंबर कसली असून गावागावात बैठक घेऊन भाजपची ध्येय धोरणे लोकांना पटवून देत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याला का आवश्यकता आहे याचे महत्त्व विशद करत प्रचाराचा धडाका लावला आहे ,त्यामुळे या मतदारसंघात यावेळी भाजप बॅक फुटवर नाही तर पुढे जाणार आहे असे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
लोकसभेची ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम म्हणून ओळखली जाते, त्यामुळे प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघात प्राबल्य राखणे गरजेचे आहे, मात्र कुडाळ -मालवण मतदार संघ हा उबाठा शिवसेनेच्या ताब्यात असून तेथील आमदार वैभव नाईक यांची या मतदारसंघात आता कसोटी लागणार आहे, मागील निवडणुकीत ते अवघ्या 12000 मतांनी विजयी झाले होते त्यामुळे हे मताधिक्य त्यांना टिकवून ठेवता येते की ते मागे पडतात हे या निवडणुकीत दिसून येणार आहे.
मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा या मतदारसंघात झालेला दहा हजार मतांनी पराभव भरून काढण्यासाठी भाजपचे व नारायणा यांचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले असून माजी खासदार डॉक्टर निलेश राणे हे या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत ,गेला महिनाभर त्यांनी या मतदारसंघात तळ ठोकला असून अगदी आकेरी ,माणगाव खोऱ्यापासून मालवणच्या टोकापर्यंत त्यांनी प्रत्येक गावात बैठका घेऊन नारायण यांच्यामुळे सिंधुदुर्गाचा विकास कसा झाला हे मतदारांच्या गळी उतरण्याचे काम केले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या सर्व टीमने त्यांना प्रचार कार्यात महत्त्वपूर्ण मदत केल्याने त्यांच्या प्रचारांच्या दोन फेऱ्या उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे निलेश राणे या मतदारसंघात निर्धारस्त आहेत.
या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना यावेळी निश्चितच लीड मिळेल असा विश्वास त्यांना आहे ,यावेळी उबाठाचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांची निशाणी मशाल ही नवीन आहे ती मतदार मतदारांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे या नवख्या निशाणीचा फायदाही भाजपला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, शिवाय केंद्रात केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांनी दोन वर्षाच्या कारकिर्दीत या जिल्ह्यामध्ये आणलेली विकास कामे ,उद्योग याचाही लेखाजोखा प्रचाराच्या, दरम्याने मांडला गेला असल्याने मोदींच्या विविध योजनाही तळागाळात पोहोचविण्याचे काम निलेश राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे, त्यामुळे अगदी आकेरीच्या टोकापासून मालवणच्या शेवटच्या गावा पर्यंत आपला विधानसभा मतदारसंघ बळकट करण्याचे काम केले आहे, कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून आपले वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मताधिक्य मिळायलाच पाहिजे यासाठी ते व त्यांचे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी महायुतीचे पदाधिकारी तन-मन अर्पण करून कामाला लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!