शिवसेनेकडून जि. प. निहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
*🛑शिवसेनेकडून जि. प. निहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०३*:-सावंतवाडी तालुक्यात शिवसेनेने आता जिल्हा परिषद निहाय पदाधिकाऱ्यांवर निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आता विभागवार पदाधिकारी नियुक्त करून त्यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी दिली. सदरचे पदाधिकारी हे त्या-त्या विभागातील विकासकामे व अडीअडचणी तालुका प्रमुखांकडे सुपुर्द करणार आहेत. त्यानंतर त्यांच्या समस्या सोडविल्या जाणार आहेत.आंबोली व माडखोल या जिल्हा परिषद मतदार संघासाठी दिनेश गावडे यांना निवडणूक प्रभारी नेमले आहे. कोलगाव व तळवडे या दोन जिल्हा परिषद मतदार संघासाठी विद्याधर परब, इन्सुली व बांदा या दोन जिल्हा परिषद मतदार संघासाठी विनायक दळवी, मळेवाड व आरोंदा या दोन जिल्हा परिषद मतदार संघासाठी एकनाथ नारोजी यांना निवडणूक प्रभारी म्हणून नेमले आहे.माजगाव या जिल्हा परिषद मतदार संघासाठी गुणाजी गावडे यांना निवडणूक प्रभारी म्हणून नेमले आहे. सावंतवाडी तालुक्याचे दोन विभाग करण्यात आले आहेत. यामध्ये आंबोली, माडखोल, कोलगाव या जिल्हा परिषद मतदार संघाची जबाबदारी सुभाष गावडे यांच्याकडे देण्यात आहे. आलेली इन्सुली, तळवडे, बांदा, मळेवाड, आरोंदा, माजगाव या जिल्हा परिषद मतदार संघाची जबाबदारी गुणाजी गावडे यांच्याकडे दिली आहे. हे दोन्ही निवडणूक प्रभारी निवडणुकीच्या संदर्भात तालुका प्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्याशी समन्वय साधतील. आवश्यक माहिती पुरवतील व त्यांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहतील, अशी माहिती मंत्री केसरकर यांनी दिली. आगामी लोकसभा निवडणूक २०२४ चा प्रचार सुरू आहे. प्रचार यंत्रणा अधिक मजबूत व्हावी यादृष्टीने सावंतवाडी-वेंगुर्ला-दोडामार्ग विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रभारी यांची नेमणूक करण्यात येत आहे. हे निवडणूक प्रभारी हे त्या-त्या जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये काम करुन या संदर्भातील माहिती देणे त्याप्रमाणे त्या विभागातील संघटना मजबूत करण्याची सर्व जबाबदारी घेतील, अशी माहिती जिल्हाप्रमुख अशोक दळवी व राजन पोकळे यांनी दिली. यानुसार आता प्रत्येक विभागानसार नियुक्त केलेले पदाधिकारी काम करणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

