कुडाळकोकणमनोरंजनमहाराष्ट्र

रील शहाणा स्पर्धेचा देवगड येथील ऋत्वीक धुरी ठरला मानकरी

*🛑 रील शहाणा स्पर्धेचा देवगड येथील ऋत्वीक धुरी ठरला मानकरी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-०२*:-रिल शहाणा आयोजित कोकणातील सर्वात मोठ्या रील शहाणा स्पर्धत देवगडचा ऋत्विक धुरी आणि त्याची टीम एक लाखाच्या पहिल्या बक्षिसांचा मानकरी ठरली. कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात हा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी सायंकाळी संपन्न झाला. कोकणचा कॅलिफोर्निया- विकासाच्या पाऊलखुणा या विषयावर या रील बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण कोकणातून १३९ रिल्स सहभागी झाली होती.
रील शहाणा २०२४ या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी सायंकाळी कुडाळच्या मराठा समाज सभागृहात झाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि श्रीफळ वाढवून या सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी भाजपच्या प्रदेश सदस्य संध्या तेरसे, भाजप पदाधिकारी रणजित देसाई, बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत,उद्योजक प्रणय तेली, साई कला मंचचे अध्यक्ष भूषण तेजम, साईनाथ जळवी, रील शहाणा स्पर्धेचे आयोजक तेजस मस्के, तुषार तळकटकर, विठ्ठल तळवलकर आदी मान्यवर उपस्थित होते. एक चांगली स्पर्धा आयोजित केल्याबद्दल प्रभाकर सावंत यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. सर्व स्पर्धकांनी कोकण विकासाबाबत अतिशय चांगल्या प्रकारे आणि अभ्यासपूर्ण रिल्स तयार केली आहेत. त्याबद्दल सुद्धा श्री. सावंत यांनी स्पर्धकांचे कौतुक केले.
त्यांनतर निवेदक निलेश गुरव आणि अमर प्रभू यांनी पारितोषिक वितरण सोहळ्याची सूत्र आपल्या हाती घेतली आणि निकाल जाहीर केला. या स्पर्धेत पहिला क्रमांक ऋत्विक धुरी आणि त्याच्या टीमने पटकावला. रोख रुपये एक लाख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले. दुसरा क्रमांक कुडाळच्या विश्वजित पालव आणि त्यांच्या टीमने पटकावला. त्यांना रोख रुपये ५० हजार, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तृतीय क्रमांक मालवणच्या मालवणी कांडेचोर या ग्रुपला मिळला. त्यांना रोख रुपये २५ हजार, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. लक्षवेधी रील म्हणून हर्षद मेस्त्री याना तर जास्त लाईक्स मिळालेली रीलसाठी मंदार शेट्ये याना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.या व्यतिरिक्त वैयक्तीक बक्षिसे सुद्धा देण्यात आली. सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या बक्षिसाचे स्वरूप होते. या व्यतिरिक्त वैयक्तीक बक्षिसे सुद्धा देण्यात आली. सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या बक्षिसाचे स्वरूप होते. यामध्ये रील शहाणा अभिनेत्री प्रथम रुची नेरुरकर, द्वितीय शुभदा टिकम, रील शहाणा अभिनेता प्रथम चारू पांजारी, द्वितीय राहुल कदम, तृतीय विद्याधर कार्लेकर. रील शहाणा संगीत प्रथम आकाश सकपाळ व ऋत्विक धुरी, द्वितीय दर्श सामंत, रील शहाणा लेखन प्रथम प्रणव प्रभू, द्वितीय निलेश जोशी, तृतीय रविकिरण शिरवलकर, रील शहाणा डीओपी प्रथम क्षितिज नेवगी, द्वितीय प्रसाद धुरी, तृतीय सिद्धेश चव्हाण, रील शहाणा एडिटर प्रथम क्षितिज नेवगी, द्वितीय आकस सकपाळ, तृतीय निलेश जोशी, रील शहाणा संकल्पना प्रथम मालवणी कांडेचोर, द्वितीय विश्वजित पालव, तृतीय निलेश जोशी, रील शहाणा प्रथम दिग्दर्शन ऋत्विक धुरी, द्वितीय देवेन कोळंबकर, तृतीय निलेश जोशी याना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ऋत्विक धुरी याने मनोगत व्यक्त करताना रिल्सच्या गर्दी मध्ये नाटक विसरू नका असे आवाहन आयोजक आणि स्पर्धकांना केले.
या संपूर्ण सोहळ्यात कुडाळचा संकल्प क्रिएशन ग्रुप, नेरूर रोमबाट ग्रुप आणि रत्नागिरीचा ग्रुप यांनी सादर केलेल्या वेगवगळ्या नृत्यांनी सोहळा अधिक रंगतदार झाला. पारितोषिक वितरण सोहळ्याला प्रणय तेली, केदार सामंत, संध्या तेरसे, नागेश नेमळेकर, साई जळवी, रुपेश नेवगी, तेजस मसके, विठ्ठल तळवलकर, तुषार तळकटकर, रुचिता शिर्के, डॉ. शरावती शेट्टी,आदि उपस्थित होते
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!