मोती तलावात आढळला युवकाचा मृतदेह ;ओळख पटली
सावंतवाडी शहरातील मोती तलावात शहरातील सालईवाडा परिसरात राहणाऱ्या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. महेंद्र मोरजकर ( ४०, सालईवाडा, सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे. राजवाडा गेट समोर तलावात पालथा असलेला मृतदेह काही जणांच्यानिदर्शनास आला. त्यानंतर याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याने परिधान केलेल्या टी-शर्ट वर डी- सालईवाडा असे लिहिलेले दिसून येत होते.याबाबतची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्यातील काही जणांना त्याची ओळख पटली . घटनास्थळी पाचारण करण्यात आले त्याने तो आपला भाऊ महेंद्र असल्याचे सांगितले. दरम्यान, संबंधित युवक तलावात पडला की त्याने आत्महत्या केली याबाबत माहिती मिळाली नाही.

