कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

गुजराती बांधवांची राजकारणात ढवळाढवळ नको – वैभव नाईक

*🛑गुजराती बांधवांची राजकारणात ढवळाढवळ नको – वैभव नाईक*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२४*:-नारायण राणे यांनी सोमवारी गुजराती बांधवांसमवेत बैठक घेतल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले. भाजप हा महाराष्ट्रात स्थानिक मराठी माणसाला डावलून गुजरात्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. सुरुवातीला व्यवसायात आणि आता राजकारणातही गुजराती लोकांचा शिरकाव भाजप करीत आहे. मुंबईत भाजपचे तीन खासदार गुजराती आहेत. परप्रांतीय लोकांमुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत चालला आहे. आता मुंबईनंतर सिंधुदुर्ग जिल्हयात व्यवसाय क्षेत्रात गुजराती लोक आले आहेत. या गुजराती बांधवांनी व्यवसायापुरतेच मर्यादित राहवे. राजकारणात ढवळाढवळ करू नये. अन्यथा सिंधुदुर्गात व्यवसायांमध्येही परप्रांतीय गुजराती लोकांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. भाजपकडून सुरुवातीला गुजराती लोकांची संघटना तयार करून आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी गुजराती बांधवांसमवेत बैठक घेतली. केवळ मतांच्या राजकारणासाठी भाजप आणि नारायण राणे गुजराती लोकांना जिल्हयाच्या राजकारणात आणून स्थानिक कोकणी-मराठी माणसाचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीकाही नाईक यांनी केली आहे.नारायण राणेंनी याहीपुढे जात गुजराती बांधवांसाठी सिंधुदुर्ग ते गुजरात विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन त्यांना दिले. पण केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या काळात चिपी विमानतळावरून अनियमित विमान सेवा सुरू आहे. मात्र, ही विमान सेवा सुरळीत करण्याऐवजी राणे हे गुजराती बांधवांच्या सोईचा विचार करत आहेत. याच राणेंनी गुजराती लोकांना रिफायनरी प्रकल्पाच्या जमिनी मिळवून देण्यासाठी कमिशन घेतले. राणेंची खासदारकीची उमेदवारी जिल्हयातील स्थानिक मराठी-कोकणी माणसाच्या मुळावर येणारी आहे. त्यामुळे कोकणी माणसाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि मुंबईप्रमाणे सिंधुदुर्गची अवस्था होऊ नये, यासाठी भाजपला आताच रोखणे गरजेचे आहे. स्थानिकांच्या मुळावर येण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना ठाकरे गटाशी आपली गाठ आहे, असा इशारा आमदार नाईक यांनी दिला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!