कोकणक्राइममहाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कारला आग, अडीच लाखाची हानी

*🛑जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कारला आग, अडीच लाखाची हानी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-२४*:-कारला अचानक आग लागण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत असून मंगळवारी कलमठ कणकवली येथील नितीनकुमार चिमनलाल पटेल यांनाही असाच फटका बसला आहे. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभी केलेल्या त्यांच्या चार चाकी ऑडी कारने अचानक मेट घेत्ला. सुदैवाने आग लागण्याच्या सुरुवातीलाच ते कारकडे परतल्याने त्यांनी, आग विझवली व मोठा अनर्थ टळला. मात्र, कारचे इंजिन व अन्य स्पेअस्मार्ट जळून गेल्याने सुमारे दोन लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे.कलमठ कणकवली येथील नितीनकुमार चिमनलाल पटेल हे मंगळवारी २३ एप्रिल रोजी सकाळी एम.एच. ०७ क्यू ९७८८ या आपल्या ऑडी कंपनीच्या कारने सिंधुदुर्गनगरी येथे आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे एका केसची सुनावणी असल्याने कार्यालयासमोरील रस्त्यावर आपली कार उभी करुन सुनावणीसाठी कार्यालयात गेले. सुनावणीचे काम संपवून ते परत आपल्या कारकडे आले. त्यावेळी त्यांना कारच्या इंजिनकडील भागातून धूर येताना दिसला. बॉनेट उघडल्यानंतर इंजिनच्या भागातून धूर येणारा पार्ट त्यांनी काढून बाहेर फेकला तर गाडीतील फायर सिलेंडर व रस्त्यावरील मातीच्या सहाय्याने आगीचा भडका उडण्यावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. दरम्यान, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसली तरी उभ्या करुन ठेवलेल्या गाडीच्या इंजिनला अचानकपणे आग लागून कारचे इंजिन, एअरकुलर, बॅटरी, वायरिंग इत्यादीचे नुकसान झाले आहे. याबाबतची खबर मिळताच सिंधुदुर्गनगरी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष कोल्हटकर यांच्यासह टीमने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. पुढील तपास पोलीस नाईक भक्ती सावंत करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!