कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

संजय राऊत यांच्या कारनाम्याची वेबसिरीज काढावी लागेल!

*🛑संजय राऊत यांच्या कारनाम्याची वेबसिरीज काढावी लागेल!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२३*:-कर्नाटकमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहिरनाम्याची सत्यता सांगितली. यावर संजय राऊत यांनी मोदी आता महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत पोहोचले आहेत, असे म्हटले आहे. संजय राऊत यांनी आपला इतिहास बघावा. डॉ. स्वप्ना पाटकरांपासूनचा इतिहास काढावा लागेल. गोरेगावच्या रॉयल पाल्ममध्ये काय होते? दिशा सालीयनचा रेप करून तिची हत्या करण्यात आली. ती आपल्या प्रियकरासोबत लग्न करणार होती. तिच्या मंगळसुत्राची काळजी का नाही वाटली? संजय राऊत यांच्या कारनाम्यांची वेब सिरीजच काढावी लागेल, अशा शब्दांत भाजप प्रवक्ते, नीतेश राणे यांनी टीका केली.पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, लखनौच्या एका प्रॉपर्टीबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सने मोठी कारवाई केली. ती प्रॉपर्टी श्रीधर पाटणकर यांची होती. हे श्रीधर पाटणकर उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत. आपला मेहुणा कधीही जेलमध्ये जाईल. येता पावसाळा आपल्या मेहुण्याला आर्थर रोड जेलमध्ये घालवावा लागणार आहे, याची कल्पना आल्यामुळेच उद्धव ठाकरे हे मोदी आणि भाजपच्या नावाने बोंब मारत आहेत. संजय राऊत हे राजकारणातील शक्ती कपूर आहेत. महिलेला जाहीर शिव्या देणाऱ्या, धमक्या देणाऱ्या राऊत यांनी आम्हाला शिकवू नये.संजय राऊत यांचे न्यूझीलंड हाऊस, पाल्म हाऊसचे कारनामे सर्वश्रुत आहेत. हिंदू धर्मातील देवी-देवतांची नावे घेण्याचाही अधिकार आता उबाठाला राहिलेला नाही. देवांची आणि छत्रपतींची नावे घेऊन आजवर उद्धव ठाकरे यांनी केवळ खंडणी मागण्याचे काम केले. अरविंद केजरीवाल हे सत्पुरुष नसून मद्य पॉलिसी घोटाळ्यात जेलमध्ये गेलेत. ‘मातोश्री’ आतां खंडणीखोर भवन राहिले आहे. स्व. बाळासाहेबांचा आणि आताच्या ‘मातोश्री’चा काडीचाही संबंध राहिला नाही, असेही राणे म्हणाले. निवडणूक आयोगाने घेतलेला आक्षेप हा योग्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता उद्धव ठाकरेंची सगळी पोलखोल करत आहेत. ‘मिलिंद नार्वेकर तो झाँकी है, श्रीधर पाटणकर बाकी है’ असे सांगत स्व. बाळासाहेबांचा बॉडीगार्ड थापा ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंकडे गेला. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या भावाची जयदेव ठाकरे यांची प्रॉपर्टी हडप केली, असेही राणे म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!