पंतप्रधान मोदींचे हात बळकट करा !
*🛑पंतप्रधान मोदींचे हात बळकट करा !*
*🛑कुपवडे येथील मेळाव्यात मंत्री नारायण राणे यांचे आवाहन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२३*:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनविले. जगात भारताचा दर्जा निर्माण केला. देशातील करोडो लोकांना गरीब कल्याण योजनेचा लाभ मिळवून दिला. गोरगरीब जनतेसाठी ५४ योजना आणल्या आणि त्या राबविल्या, असे सांगून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी कमळ या निशाणीवर मतदान करून पुन्हा एकदा भाजपची सत्ता येण्यासाठी प्रत्येकाने मतदान करा, असे आवाहन केंद्रीयमंत्री व महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी केले. कुपवडे येथील साई मंदिर हॉल येथे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रचारार्थ महायुतीचा कार्यकर्ता मेळावा झाला. त्यावेळी राणे बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मिलिंद कुलकर्णी, प्रदेश सदस्या संध्या तेरसे, कुडाळ मंडल अध्यक्ष दादा साईल, सरपंच दिलीप तवटे, बाळू मडव, नारायण गावडे आदी उपस्थित होते.हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना गेल्या पाच वर्षांत उद्धव ठाकरे यांनी संपविल्याची टीकाही राणे यांनी केली. या निवडणुकीमध्ये विकास करणाऱ्या आणि भारताला प्रगतीपथावर घेऊन जाणाऱ्या भाजपला मतदान करा. हे मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी होणार आहे, असे राणे म्हणाले.
*मोदींचे हात बळकट करा !*
राणे म्हणाले, १९९० पूर्वीचा सिंधुदुर्ग आठवला, तर जिल्हयामध्ये पाणी, आरोग्य, रस्ते, वीज या मूलभूत गरजांसाठी जनता त्रस्त झाली होती. मात्र, आता सिंधुदुर्ग जिल्हयात चांगल्या सुविधा मिळत आहेत. यासाठी माझ्या आयुष्यातील ३५ वर्षे राजकारण, समाजकारणाच्या माध्यमातून जिल्ह्याला दिली. या जिल्हयाचा विकास व्हावा म्हणून माझी सातत्याने तळमळ राहिली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये काम करत असताना मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले मतदान कमळ या निशाणीवर करावे आणि पंतप्रधान मोदींचे हात बळकट करावे, असे आवाहन त्यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

