🛑 विकासाचा सर्व बॅकलॉग सहा महिन्यात भरून काढू असे सांगणाऱ्या केसकरांनी आपली आमदारकी भोगलेली १५ वर्षे आठवावी ; उबाठा युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे
🛑 तालुक्यात रोजगार नाही, तरुण पिढी गोवा राज्यावर अवलंबून आहे यावरून केसरकर किती कर्तबगार आहेत ते जनतेने ओळखावे
🛑 केसरकर व राणे या दोन्ही मंत्र्यांनी स्वतः चे आत्मपरिक्षण करावे ; मदन राणे
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२२:- नारायण राणे व दीपक केसरकर हे दोघेही मंत्री असून रोजगार नाही हे दुर्दैव, दीपक केसरकरांना निवडणुकीच्या तोंडावरच रोजगार आठवतात का?असा सवाल उद्धव बाळसाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे यांनी केला आहे. नारायण राणे व दीपक केसरकारांनी स्वतः चे आत्मपरीक्षण करावे,व नंतरच निष्ठावंत खासदार विनायक राऊत यांच्यावर बोलावे तसेच खासदार विनायक राऊत यांची चिंता केसरकरांनी करून नये, आपण आमदार झालात हे निष्ठावंत शिवसैनिकां मुळेच हे विसरू नये तसेच येणाऱ्या निवडणुकीत जनता तुंम्हाला धडा शिकवणार असे मदन राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
दोडमार्ग व सावंतवाडी तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर तरूण युवक,युवती उच्च शिक्षण घेऊन सुद्धा शेजारी असलेल्या गोवा राज्यात दरमहा ८ ते १० हजाराज्या नोकरी साठी जातात.अशा कामानिमित्त ये- जा करताना कित्येक जण अपघातात मृत्यू देखील पावलेले आहेत.मात्र अशा तरुण तरुणींची रोजगाराचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो.पंधरा वर्षे आमदार पद भूषवलेले शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे मात्र बेरोजगारांना कायम रोजगाराचे गाजर दाखवीत असतात.महायुतीने आयोजित केलेल्या सभेत केसरकर म्हणाले की,विकासाचा सर्व बॅक लॉक सहा महिन्यात भरून काढू असे वक्तव्य करण्या अगोदर केसरकर १५ वर्षे आमदारकी भोगली हे विसरले आहेत का?असा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
केंद्रीय मंत्री पद असून देखील तालुक्यातील तरुण पिढी शेजारी असलेल्या गोवा राज्यावर अवलंबून आहे. मंत्री आता प्रचार सभेत उद्योगधंदे सुरू करणार अशी ग्वाही देतात हे कितपत योग्य आहे हे त्यांनीच ठरवावे.
आचार संहिता लागण्या अगोदर भाजपच्या व शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी भूमिपूजन केली मात्र प्रत्यक्ष भूमिपूजन केले तेथे काम सुरू नाही.फक्त जनतेच्या डोळ्यात निव्वळ धुळफेक व जनतेची दिशाभूल महायुतीचे पक्ष करतात असा आरोप मदन राणे यांनी केला आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

