अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा
*🛑अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-१९*:-महाराष्ट्रातील दोन लाख दहा हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधनाअभावी उपासमार होते आहे. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या महाराष्ट्र अध्यक्षा अॅड. निशा शिवूरकर यांनी शासनाकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे मानधन त्वरित जमा करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती कमल परुळेकर यांनी दिली.सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर विविध कामे लादते. निवडणूक प्रशिक्षण, आरोग्याची कामे सोपवली जातात. परंतु अल्प मानधनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर देण्याची जबाबदारी मात्र टाळत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. सणासुदीच्या दिवसात मानधन नसल्यामुळे सण साजरे करणे या कर्मचाऱ्यांना मुश्कील झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.एकीकडे बेटी बचाव, बेटी पढाव घोषणा द्यायची, मात्र महिला व बाल कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन द्यायचे नाही, या विसंगतीकडे अॅड. निशा शिवूरकर यांनी लक्ष वेधले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाच्या उदासीनतेचा कर्मचारी सभेने निषेध करत त्वरित मानधन जमा करावे, अशी मागणी केली आहे. यावेळी सरचिटणीस कमल परुळेकर, कार्याध्यक्ष कृष्णा भानारकर, उपाध्यक्ष नितीन पवार आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

