कुडाळकोकणक्राइममहाराष्ट्र

निवडणूक पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात पोलिसांचे संचलन

*🛑निवडणूक पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात पोलिसांचे संचलन*

*🛑१७५ अंमलदार, २ दंगल नियंत्रण पथकांचा समावेश*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१८*:-लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवारी सायंकाळी कुडाळ शहरात पोलीस प्रशासनाच्यावतीने संचलन करण्यात आले. निवडणूक शांततेत व्हावी, या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून हे संचलन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशाने व अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयातील पोलीस अधिकारी, अंमलदार, दंगल नियंत्रण पथके यात सहभागी झाली होती.लोकसभा निवडणूक ७ मे रोजी होणार आहे. काही दिवसांवर निवडणूक असल्याने त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी, यासाठी पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. या अनुषंगाने कुडाळ शहरात मंगळवारी सायंकाळी पोलीस संचलन करण्यात आले.कुडाळ पोलीस ठाणे येथून संचलनास प्रारंभ झाला. त्यानंतर शिस्तबद्ध रितीने शहरातील जिजामाता चौक, शिवाजीनगर, समादेवी, बाजारपेठमार्गे गांधीचौक, बसस्थानक येथून पुन्हा पोलीस ठाण्यापर्यंत संचलन करण्यात आले. यात अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी (सावंतवाडी) कविता गायकवाड, कुडाळच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, सावंतवाडी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले, वाहतूक पोलीस निरीक्षक उदय झावरे, बांदा पोलीस निरीक्षक बडवे, निवती सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकुर, कुडाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड, कुडाळचे उपनिरीक्षक गजेंद्र पालवे, गणेश कऱ्हाडकर, रवींद्र भांड, संतोष भालेराव व कांबळे यांच्यासह अन्य सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच पोलीस अधिकारी यांच्यासह २० अधिकारी, १७५ अंमलदार, दोन दंगल नियंत्रण पथके व बारा होमगार्ड यात सहभागी झाले होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!