कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

सामंत कुटुंबियांच्या मदतीची जाण वैभव नाईकांनी ठेवावी !

*🛑सामंत कुटुंबियांच्या मदतीची जाण वैभव नाईकांनी ठेवावी !*

*🛑मंत्री उदय सामंत यांचे प्रत्युत्तर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴रत्नागिरी, दि-१८*:-किरण सामंत यांच्या उमेदवारी अर्जावर आमदार वैभव नाईक यांनी उडविलेल्या खिल्लीला मंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘मातोश्री’ला खुश करण्यासाठी वैभव नाईक यांनी वायफळ बडबड करू नये. सामंत कुटुंबियांनी केलेल्या मदतीचा नाईक यांनी माणुसकी म्हणून विचार करावा. राजकारणामुळे मैत्रीचे संबंध तुटू नयेत, याची काळजी घ्यावी, हा आपला मित्रत्वाचा सल्ला असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. असे असताना उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती समोर आली. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार नाईक यांनी किरण सामंत यांना चिमटा काढला होता.किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज घेतला असल्यास तो भरावा. उमेदवारी अर्ज म्हणजे टेंडर अर्ज नाही. तो मॅनेज करता येत नाही,अशी खिल्ली वैभव नाईक यांनी उडविली होती. तसेच नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूर येथील अदृश्य शक्तींचाच हात आहे. राणे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला उमेदवारीसाठी ताटकळत ठेवणे हा त्यांचा अपमान असल्याचा टोलादेखील नाईक यांनी लगावला होता.वैभव नाईक यांच्या खोचक टोल्याचा मंत्री सामंत यांनी समाचार घेतला. वैभव नाईक हे मुख्यमंत्र्यांना कितीवेळा भेटतात आणि कशासाठी भेटत असतात? शिवसेनेत यायचे की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, किरण सामंत यांनी आजपर्यंत केलेल्या मदतीची त्यांनी जाण ठेवावी. वैभव नाईक व आपण महाविद्यालयापासूनचे मित्र आहोत. राजकारणामुळे मैत्रीचे संबंध कधीही तुटणार नाहीत, याची त्यांनी ‘काळजी घ्यावी. वैभव नाईक यांनी किरण सामंत यांच्या टेंडरविषयी बोलू नये. त्यांचे बंधू काय किराणा मालाचे दुकान चालवत नाहीत. ते देखील टेंडर घेत असतात. सामंत कुटुंबियांनी केलेली मदत त्यांनी विसरू नये, असे प्रत्युत्तर उदय सामंत यांनी दिले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!