टाळंबा धरणाच्या निविदेमुळे धरणग्रस्तांमध्ये खळबळ
*🛑टाळंबा धरणाच्या निविदेमुळे धरणग्रस्तांमध्ये खळबळ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दुकानवाड, दि-१५*:-ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत टाळंबा धरणाच्या निविदेमुळे धरणग्रस्तांमध्ये खळबळ उडाली असून धरणग्रस्त कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. १९८१ मध्ये या धरणाची अधिसूचना जारी झाली आणि या धरणाला टाळंबा बुडीत क्षेत्रातील चाफेली, पुळास, हळदीचे नेरुर, उपवडे, साकिर्डे, वसोली, अंशतः आंजिवडे या गावातील प्रकल्पग्रस्तांनी विरोधी भूमिका घेत आपला विरोध आजपर्यंत कायम ठेवला. मध्यंतरी समांतर पुनर्वसनाच्या अटीवर काम सुरू करण्यात आले. परंतु अटी पूर्ण होऊ न शकल्याने आंदोलन करून काम बंद पाडले. ते अद्याप सुरू झालेले नाही. आकारीपड जमीन, वनसंज्ञा, वनजमीन, खातेफोड, रिंग रोडः पुनर्वसन या प्रश्नांमुळे तीव्र विरोध होऊ लागला. शासन अद्यापही. हे प्रश्न सोडवू शकले नाही. आता तर हे प्रश्न अधिक जटील झाले आहेत.चार ते पाच वर्षे धरणाच्या सर्व हालचाली बंद होत्या. या भागातील आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत हे धरणग्रस्तांच्या बाजूने असल्याने धरणाच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही. ‘आधी पुनर्वसन मग धरण’ या मागणीवर नेते व धरणग्रस्त ठाम राहिले. त्यामुळे सर्व कामे ठप्प होती.धरणग्रस्तांचे नेते बाळा सावंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने, मोर्चे झाले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत कामाला सुरुवात करू नये, अशी भूमिका बाळा सावंत व धरणग्रस्तांची असल्याने कामाला सुरुवात करण्यात आली नव्हती. मध्यंतरी बाळा सावंत यांचे निधन झाले आणि धरणग्रस्त पोरके झाले.ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही निविदा प्रसिद्ध झाली असल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

