महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाकडून अजून एक अटक..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴मुंबई,दि.३०: महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून केलेल्या अन्वेषणातून असे निदर्शनास आले की, श्री. योगेश जगदीशप्रसाद कनोडिया या व्यक्तीने मे.यश फैब्रिक्स, मे. श्री.गणेश टेक्सटाईल, मे.जे.के फॅब्रिक्स व मे.क्रिष्णांश इंटरप्रायजेस, या नावे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा, २०१७ अन्वये नोंदणी करून जीएसटीआयएन क्रमांक प्राप्त केले आहेत. मात्र नोंदणी करताना या व्यक्तीने खोट्या कागदपत्रांचा वापर करून नोंदणी क्रमांक प्राप्त केल्याचे दिसून आले.
तसेच नोंदणीकृत व्यापारी संस्था प्रत्यक्ष खरेदी वा विक्री व्यवहार न करता मोठ्या प्रमाणावर खोटी बिजके / देयके स्वीकारत व निर्गमित करत असल्याचे दिसून आले. श्री.योगेश कनोडिया यांनी दिलीप टिबरेवाल यांच्याकडून रू.१७५ कोटी इतक्या रक्कमेची खोटी देयके व त्यायोगे, कोणत्याही मालाची प्रत्यक्ष देवाणघेवाण न होता रू.११.५४ कोटी इतक्या रक्कमेचा बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करून घेतला. दिलीप टिबरेवाल या व्यक्तीस वस्तू व सेवा कर विभागाने या पूर्वीच खोटी देयके निर्गमीत करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
योगेश कनोडिया यांनी खोट्या खरेदी देयकांआधारे रु.१८५ कोटी इतक्या रक्कमेचा विक्री व्यवहार वरील ०४ व्यापारी संस्थांच्या माध्यामातून केल्याचे दाखविले आहे. मात्र तपासातून असे निष्पन्न झाले आहे की, या रू.१८५ कोटीच्या विक्री रक्कमेपैकी रू.११९ कोटी इतक्या रक्कमेच्या मालाची प्रत्यक्षात कधीही देवाणघेवाण झालेले नाही, व त्या रक्कमेशी निगडीत रू.९ कोटी इतका इनपुट टॅक्स क्रेडिट हा बोगस असून प्रत्यक्ष खरेदी-विक्री झालेली नाही. प्रकरणाचा तपास चालू असून बोगस विक्री व बोगस आयटीसी या दोन्हींची रक्कम वाढण्याची शक्यता आहे.
योगेश कनोडिया यांचे हे कृत्य महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा २०१७ चे कलम १३२ (१) (बी) व (सी) नुसार गुन्हा असून, कलम १३२ (१) (१) नुसार- कमीतकमी ६ महिने, जास्तीत जास्त ५ वर्ष तुरूंगवास, आणि दंड- इतक्या शिक्षेस पात्र आहे. तसेच कायद्याच्या कलम १३२ (५) नुसार अपराध दखलप्राप्त व अजामिनपात्र आहे.
त्यामुळे योगेश कनोडिया यांना महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून वस्तू व सेवा कर कायदा २०१७, च्या कलम ६९ अन्वये बुधवार दि. ३० डिसेंबर २०२० रोजी कांदिवली (पूर्व), मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने योगेश कनोडिया यांना दि. १३ जानेवारी, २०२१ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने याद्वारे करदात्यांस महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायद्यानुसार कर भरणा व इतर बाबींची पूर्तता नियमितपणे करण्याबाबत पुन:श्च एकदा आवाहन केले आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_