कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

मुंबई उपनगरातून जादा एसटी बसेस सोडाव्यात !

*🛑 मुंबई उपनगरातून जादा एसटी बसेस सोडाव्यात !*

*🛑 ‘कोविआ’चे अध्यक्ष मोहन केळुस्कर यांची मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०६*:-कोकणातील चाकरमानी मुंबई सोडून विविध उपनगरात तसेच मुंबई बाहेर ठाण्यापलिकडील शहरांमध्ये विस्थापित झाला आहे. त्यामुळे अशा प्रवाशांना स्थानके गाठणे जिकिरीचे होते. त्यामुळे उन्हाळी प्रवासी हंगामात रा. प. महामंडळाने मुंबईतील उपनगरांसह डोंबिवली, विरार आदी शहरांतून जादा बसेस सोडाव्यात, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रवासी संघटनेचे सल्लागार मोहन केळुसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.होळीच्या सणासाठी कोकण रेल्वेनेही जादा गाड्या सोडल्या होत्या. मात्र, त्याचे आरक्षण अल्पावधीतच पूर्ण झाले. सर्वसामान्य डब्यांतून प्रवाशांना उभ्यानेच प्रवास करावा लागला. असे स्पष्ट करून केळुसकर म्हणाले, होळी दरम्यान एसटीने प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या सोडल्या. मात्र, मुंबईतील ठराविक स्थानकांतून या गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना अशा स्थानकांवर पोहोचणे हेही एक दिव्यच आहे. गेल्या वर्ष- दीड वर्षात परिवहनमंत्र्यांनी रा. प. महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना काही चांगल्या सवलती दिल्या आहेत. त्यामुळे एसटीला अच्छे दिन आले आहेत. मुंबईकर कोकणवासीय बहुतांश चाकरमानी गेल्या काही वर्षांत मध्य मुंबई सोडून उपनगरांसह ठाणे, त्यापलिकडेही डोंबिवली, विरार, नवी मुंबई आदी शहरांमध्ये विस्थापित झाला आहे. रेल्वे आरक्षण न मिळाल्यास तो नाईलाजास्तव खासगी गाड्यांकडे वळतो. तेथे त्यांची लूट होते. या परिस्थितीत एसटीने खासगी गाड्या रवाना होत असलेल्या भागांतून जादा गाड्या सोडण्याची व्यवस्था करावी. एसटी थांब्यांसाठी निवारे बांधावेत. त्यामुळे प्रवाशांची होणारी परवड थांबेल, असेही केळुस्कर यांनी म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!