कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

कुलर वापरताना, सुरक्षेची काळजी घ्या !

*🛑कुलर वापरताना, सुरक्षेची काळजी घ्या !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०६*:-सध्या तापमानाचा पारा वाढत आहे. वाढत्या तापमानापासून बचावासाठी वातानुकूलित यंत्रांचा वापर वाढतो. त्यात कुलरच्या वापरास पसंती दिली जाते. कुलरच्या थंड हवेचा गारवा अनुभवताना विद्युत सुरक्षेबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वीज महावितरणकडून करण्यात आले आहे.कुलर वापरत असताना ओल्या हाताने तो सुरू वा बंद करणे, त्याला स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करावा. कुलरची मांडणी करताना कुलरच्या सान्निध्यात लहान मुले येणार नाहीत, अशा पद्धतीने करावी. कुलरच्या पंख्यासमोर जाळी लावलेली असावी. त्यामुळे लहान मुलांचा हात कुलरच्या पंख्यात जाणार नाही. कुलरसाठी श्री पिन प्लग व सॉकेटचा वापर करावा. कुलरच्या वीजतारांचे (वायर्सचे) आवरण सुस्थितीत असल्याची खात्री करावी. जुन्या, कालबाह्य व जोड वायर्सचा वापर करू नये. जुने कुलर वापरात घेताना तपासणी व तांत्रिक बिघाड दुरुस्ती मान्यताप्राप्त व्यावसायिक तंत्रज्ञाकडून करून घ्यावी. आपल्या घरातील, व्यवसायाच्या ठिकाणच्या विद्युत संच मांडणीतील अर्थिग सुस्थितीत असल्याची तपासणी परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून करून घ्यावी. जुन्या वायरिंगची तपासणी करून खराब झालेली तसेच आवरणाची रोधक क्षमता कमी झालेली वायरिंग तात्काळ बदलण्यात यावी. विद्युत संच मांडणीत अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स बसविणे गरजेचे आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!