गवा रेड्याच्या हल्ल्यात चौकुळ येथील शेतकरी गंभीर जखमी
आंबोली, ता. ०५: चौकुळ येथील सीताराम गावडे (वय ८०) हे सकाळी उठल्यावर घराच्या पाठीमागे काही कामा निमित्त गेले होते, त्यांच्यावर गव्या रेड्याने अचानक हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झालेत ,त्याना अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गवा रेड्याने हल्ला केल्याने चौकुळ येथील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. सीताराम गावडे सकाळी नेहमीप्रमाणे उठून आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात गेले होते, त्यांच्यावर अचानक गवा रेड्याने हल्ला चढवला,त्यांनी आरडाओरड करताच घरातील व आजूबाजूची माणसे जमा झालीत व गवा रेडा पळून गेला,या घटनेमुळे चौकुळ गावात भितीचे वातावरण पसरले आहे.

