विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी तळवडे येथील दोघांवर गुन्हा दाखल
*🛑विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी तळवडे येथील दोघांवर गुन्हा दाखल*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-०५*:-विनापरवाना गैरकायदा काडतूस बंदूक ताब्यात ठेवून लपवून ठेवल्याप्रकरणी तळवडे लाडवाडी येथील दोन संशयितांवर सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. रमेश दत्ताराम लाड (७०) व अजिंक्य महादेव राऊत (३३) अशी संशयितांची नावे आहेत. या कारवाईत प्रत्येकी २० हजार रुपयांची दोन काडतूस बंदूक व १६०० रुपयांची जिवंत काडतुसे असा एकूण ४५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी तळवडे लाडवाडी येथे करण्यात आली. सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरुवारी तळवडे लाडवाडी येथे दोन ठिकाणी छापा टाकला. यात सकाळी पावणेबारा वा. तेथील रमेश दत्ताराम लाड यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या लाकडाच्या ढिगाऱ्याखाली पथकाला २० हजार रुपये किंमतीची काडतूस बंदूक सापडली. तसेच १६०० रुपयांची जिवंत काडतुसे लपवून ठेवलेल्या स्थितीत सापडली. याप्रकरणी संशयित रमेश लाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तेथीलच अजिंक्य महादेव राऊत याने त्याच्या आंबा बागेतील मांगराच्या पाठीमागील गवताच्या ढिगाऱ्याखाली २० हजार रुपये किंमतीची काडतूस बंदूक लपवून ठेवलेल्या स्थितीत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. याप्रकरणी संशयित अजिंक्य राऊत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शेळके, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोयंडे, राजेंद्र जामसंडेकर, श्रेया गवस, आशिष गंगावणे, खंडे, स्वाती सावंत यांच्या पथकाने केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

