🛑 नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई, दि-०४:– पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून दरवर्षी मुंबईत केल्या जाणाऱ्या नालेसफाईला यंदा सुरूवात झाली आहे. मोठे नाले, लहान नाले, भूमिगत गटारे यांच्यातील गाळ काढण्यासाठी कार्यादेश देण्यात आला असून आतापर्यंत एकूण १५ टक्के गाळ काढण्यात आला आहे.यावर्षी एकूण १० लाख २१ हजार ७८१.९२ मे.टन गाळ काढण्याचे लक्ष्य आहे. या कामासाठी ३१ कंत्राटदार निश्चित करण्यात आले असून २४९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी व नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे केली जातात. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ७५ टक्के गाळ हा पावसाळ्यापूर्वी काढला जातो, तर १५ टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान आणि १० टक्के पावसाळ्यानंतर काढला जातो. ही कामे दरवर्षी मार्च महिन्यात सुरू होतात. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून नालेसफाईच्या कामांना मुंबईत सुरूवात झाली आहे. आतापर्यंत १५ टक्के गाळ काढण्यात आला आहे. यंदा प्रशासकीय राजवट असून सध्या आचारसंहिता लागलेली आहे. मात्र नालेसफाईच्या कामांची निविदा प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असून कार्यादेशही देण्यात आले आहेत. मिठी नदीतील गाळ काढण्याचे दोन वर्षांचे कंत्राट गेल्यावर्षीच देण्यात आले आहे.
मोठ्या नाल्यांतून जवळपास सव्वा पाच लाख मेट्रीक टन गाळ काढणे अपेक्षित आहे. लहान नाल्यांतून साडेचार लाख मेट्रीक टन गाळ काढण्यात येणार आहे. मिठी नदी व लहान, मोठे नाले यातून वर्षभरात एकूण १३ लाख मेट्रीक टन गाळ काढणे अपेक्षित आहे. त्यापैकी ७५ टक्के म्हणजे १० लाख मेट्रीक टन गाळ ३१ मे पूर्वी काढला जाणार आहे. त्यासाठी सध्या दोन पाळ्यांमध्ये कामे सुरू झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मोठ्या नाल्यांचे काम हे तीन पाळ्यांमध्ये सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. उपनगरांमध्ये मोठे नाले हे बंदिस्त नाहीत त्यामुळे इथे नालेसफाईची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र शहर भागात नाले बंदिस्त असल्यामुळे इथे कामांवर थोडी मर्यादा येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यंदा अचानक पाहणी
नालेसफाई आणि त्यासाठी केला जाणारा खर्च यावरून नेहमीच पालिकेवर टीका होत असते. नालेसफाई झालीच नसल्याचा दावा विरोधक करत असतात. त्यामुळे नालेसफाई ही पालिका प्रशासनाची खरी कसोटी असते. त्यातच यावेळी प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे प्रशासनाने खूप खबरदारी घेतली असून नालेसफाईच्या कामांवर तंत्रज्ञानाद्वारे नजर ठेवली जाणार आहेच. पण या कामांची अचानक पाहणी करण्यात येणार असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.मुंबईतील मोठे नाले, लहान नाले तसेच मिठी नदी यांची एकूण लांबी सुमारे ६८९ किमी आहे. मुंबई व उपनगरात ३०९ मोठे नाले, १५०८ लहान नाले, रस्त्याच्या कडेला असलेली २००० किमी लांबीची गटारे, पाच नद्या यातून हे पावसाचे पाणी वाहत असते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

