जात पडताळणी अर्जासाठी राज्य सरकार कडून मुदतवाढ; मंत्री धनंजय मुंडे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴मुंबई,दि.२९: राज्यात होत असलेल्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची धूमधाम सध्या सुरु आहे. तर त्यात ऑनलाईन प्रक्रियेचा वेग मंदावला होता. ऑनलाईन अर्ज व ऑफलाईन अर्ज भरण्याची उद्याची शेवटची तारीख होती. मात्र, आता जात पडताळणी अर्जासाठी राज्य सरकार कडून मुदतवाढ मिळाली असून यावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
आज २९ डिसेंबर व उद्या ३० डिसेंबर या दोन दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी जात पडताळणीचे अर्ज स्वीकारावेत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व जात पडताळणी समित्यांना दिले आहेत.
अर्ज स्विकारण्याच्या खिडक्या वाढवाव्यात तसेच दोन्ही दिवशी कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करून आलेले सर्व अर्ज दाखल करून घ्यावेत, असे आदेश सर्व जात पडताळणी समित्यांना दिले आहेत. सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहन देखील मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी व आवश्यकतेनुसार पोलीस विभागास संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. अर्जदारांची संख्या विचारात घेता आवश्यकतेनुसार अर्ज स्वीकारण्याचा टेबल आणि खिडकी वाढणवण्यात यावी. कार्यालय पूर्ण वेळ तसेच सर्व अर्जदारांचे अर्ज स्वीकारेपर्यंत दोन्ही दिवशी कार्यालय सुरू ठेवावेत, अशा सूचना देखील जात पडताळणी समित्यांना देण्यात आल्या आहेत.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

