रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी २८० झोनल अधिकारी

*🛑 रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी २८० झोनल अधिकारी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०२*:-लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली असून या निवडणुकीमध्ये कोणत्याही उणिवा राहू नयेत, यासाठी निवडणूक प्रक्रिया योग्यप्रकारे पार पाडण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात २५० झोनल अधिकारी व ३० राखीव झोनल अधिकारी असे २८० अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांच्या सहकार्याने नगर पालिकांमार्फत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारी मनुष्यबळाची नियुक्ती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात झोनल अधिकारी व राखीव झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये चिपळूणला झोनल अधिकारी ३९ व राखीव झोनल अधिकारी चार असे ४३ अधिकारी नियुक्त केले आहेत. रत्नागिरीत झोनल अधिकारी ३५, राखीव झोनल अधिकारी चार असे ३९ अधिकारी नियुक्त केले आहेत. राजापूरमध्ये झोनल अधिकारी ४९, राखीव झोनल अधिकारी चार असे ५३ अधिकारी नियुक्त केले आहेत. कणकवलीत झोनल अधिकारी ४७, राखीव झोनल अधिकारी सहा असे एकूण ५३ अधिकारी नियुक्त केले आहेत. कुडाळमध्ये झोनल अधिकारी ३८, राखीव झोनल अधिकारी सहा असे एकूण ४४ अधिकारी नियुक्त केले आहेत. सावंतवाडीत झोनल अधिकारी ४२, राखीव झोनल अधिकारी सहा असे एकूण ४८ झोनल अधिकारी नियुक्त केले आहेत. याप्रमाणे विधानसभा मतदार संघनिहाय झोनल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात २५० झोनल अधिकारी आणि राखीव ३० झोनल अधिकारी असे एकूण २८० अधिकारी नियुक्त केले आहेत. निवडणुकीसाठी झोनल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबरोबरच आता निवडणूक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचीही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. लवकरच मतदान केंद्रनिहाय निवडणूक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या देणे व त्यांना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!