कुणकेरी हुडोत्सव आज
*🛑कुणकेरी हुडोत्सव आज*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे, दि-३०*:-सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावचा आगळावेगळा व वैशिष्ट्यपूर्ण हुडोत्सव शनिवारी ३० मार्चला होत आहे. महाराष्ट्रात पंढरपूरनंतर कुणकेरी गावातच हुडोत्सव होत असून १०० फुटी हुड्यावर चढणाऱ्या संचारित अवसरांच्या थरारासह भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. शुक्रवारी दुपारी २ वाजता गाव रोंबाट सुटले त्यांनतर सायंकाळी ६ वाजता हुड्याजवळ सामूदायिक नारळ फोडण्यात आला. रात्री ९ वाजता घुमटवादनासह हुडा आणि होळीवर धूळ मारण्यात आली. त्यानंतर रात्री १० वाजता गाव रोंबाट निघणार असून आणि रात्री ११ वाजता हुडा आणि होळीवर पेटत्या शेणी फेकून ढोल-ताश्यासह भाभीचे रोंबाट आणून नंतर कवळे व पेटत्या मशाली घेऊन हुडा आणि होळीभोवती फिरण्याचा कार्यक्रम होतो.शनिवार ३० रोजी हुडोत्सवाचा मुख्य दिवस असून या दिवशी सकाळपासून भावई देवीच्या निवासस्थानी देवीची ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ वाजता मांडावरून गाव रोंबाट सुटणार असून याचवेळी पळसदळा येथे आंबेगावच्या श्री देव क्षेत्रपाल निशाणाची भेट होणार आहे त्यानंतर कोलगाव सीमेवर कलेश्वर देवस्थानची निशाण भेट होऊन सर्वजण भावई मंदिरकडे येणार आहे. सायंकाळी ४ वाजता हुड्याजवळ घोडेमोडणी व लुटुपुटूचा खेळ होणार असून सायंकाळी ५ वाजता हुड्यावर चढलेल्या अवसारांवर दगड मारण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाने हुडोत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी हुडोत्सवाचा आणि श्री दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटी, गावपंच आणि कुणकेरी ग्रामस्थांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

