कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

बांदा चेकपोस्ट वर २० लाखाची दारु पकडली-बांदा पोलिसांची कारवाई

*🛑बांदा चेकपोस्ट वर २० लाखाची दारु पकडली-बांदा पोलिसांची कारवाई*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-२१*:-बांदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांदा पोलीस चेकपोस्टवर बेकायदा दारू वाहतुकीच्या विरोधात बांदा पोलिसांनी आज पहाटे कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५०९ दारूचे बॉक्स (किंमत १९ लाख ५४ हजार ५६० रुपये) व १० लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण २९ लाख ५४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी मोर्ला रवी व गुडीपुडी सुबराव साई कुमार (दोघेही रा. कुरनूल, आंध्र प्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास बांदा पोलीस चेकपोस्टवर करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून महाराष्ट्रात होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यानुसार सीमावर्ती भागातील चेकपोस्टवर गोव्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू आहे. पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास गोव्यातून येणारा ट्रक (टीएस ०५ युडी २७५७) तपासणीसाठी थांबविण्यात आला. ट्रकची तपासणी केली असता त्यात गोल्डन हॉक प्रीमियम ब्रांडी या गोवा बनावटी दारूचे ५०९ पुठ्ठ्याचे बॉक्स आढळून आलेत. बाजारभावाप्रमाणे दारूची किंमत १९,५४,५६० रुपये आहे. तसेच १० लाख रुपयांचा दारू वाहतुकीसाठी वापरलेला ट्रकही ताब्यात घेण्यात आला.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या आदेशान्वये व उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, पोलीस हवालदार देवदत्त कांडरकर, पोलीस शिपाई राकेश चव्हाण, पोलीस हवालदार सीताकांत नाईक, पोलीस नाईक बाळकृष्ण गवस, होमगार्ड सतीश सावंत, शिवशंकर सावंत, तुकाराम जंगले, स्थायी सर्वेक्षण पथकातील आनंद मांजरेकर व प्रवीण राऊळ यांच्या पथकाने केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!