शेर्लेत ‘दलितवस्ती सुधार’चा निधी अन्यत्र वळविला!
*🛑शेर्लेत ‘दलितवस्ती सुधार’चा निधी अन्यत्र वळविला!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि-१९*:-दलितवस्ती सुधार योजना ही केवळ – दलित बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी असताना, शिवाय शेर्ले सरपंच या त्याच समाजाचे असताना त्यांनी हा निधी अन्यत्र वळविण्याचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे सादर केल्याने दलित समाजाने तीव्र नाराजी व्यक्त करून या प्रस्तावाच्या विरोधात आंदोलन उभारण्याचाः इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या संदर्भातील निवेदन ग्रामस्थांनी सरपंचांना दिले असून या निवेदनवर शेर्ले-सिद्धार्थनगर येथील १०० ग्रामस्थांच्या सह्या आहेत. ग्रामस्थांनी शेर्ले सरपंचांना दिलेल्या निवेदनानुसार दलित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना खास दलितांसाठी राबविण्यात येतात. याच योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजना असून या योजनेतून विविध योजना राबविल्या जातात. त्यात दलित वस्तीत जाण्यासाठी साकवही मंजूर केला जातो. त्यानुसार शेर्ले दलित वस्तीत जाण्यायेण्यासाठी कोणतेही नदी नाले नसतानाही अथवा साकवाची त्यांना गरज नसतानाही या दलित वस्तीपासून सुमारे दीड दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पानोसेवाडी येथील साकवासाठी हा प्रस्ताव शासन स्तरावर सादर केला आहे. या प्रस्तावाची कुणकुण दलित बांधवांना लागल्यानंतर त्यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर ग्रामपंचायतीने आढेवेढे घेत या प्रस्तावाला बगल देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सदर प्रस्तावाच्या विरोधात दलित बांधवांनी दंड थोपाटले असून यासंदर्भात गटविकास अधिकारी, संबंधित अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रस्ताव रद्द करावा, असे म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

