स्पीडब्रेकरमुळे होणारा त्रास कमी करणार !
*🛑स्पीडब्रेकरमुळे होणारा त्रास कमी करणार !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१८*:-शहरातून जाणाऱ्या महामार्गावर घातलेले स्पीडब्रेकर येत्या आठ दिवसात समपातळीत ठेवण्याबाबत उपाययोजना हाती घेऊन वाहनधारकांना होणारा त्रास दूर केला जाईल, असे आश्वासन महामार्ग विभागाचे उपअभियंता वैभव सगरे यांनी सावंतवाडी तालुका तीन आसनी रिक्षाचालक व मालक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली, अशी माहिती संघटनेचे सल्लागार तथा कोकण रिक्षा महासंघाचे सचिव सुधीर पराडकर यांनी दिली. दरम्यान, सावंतवाडी शहर हितवर्धक मंचाचे अध्यक्ष सुरेश भोगटे यांच्यासह शिष्टमंडळाने सरगे यांची भेट घेऊन या प्रश्नाबाबत लक्ष वेधले.साबांखाकडून शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर बापूसाहेब महाराज पुतळा, शिवाजी चौक व तीनमुशीनजीक अतिउंच दहा ते बारा धोकादायक स्पीडब्रेकर घातले. अशा धोकादायक स्पीडब्रेकरमुळे रिक्षामधील प्रवाशांना शारीरिक त्रास व दुचाकी तसेच अन्य वाहनांचे पार्ट निखळून पडणे, दुचाकी वाहनांचे अपघात घडत होते. सदरचे स्पीडब्रेकर हटविण्याबाबत व मोजकेच स्पीडब्रेकर ठेवून उंची कमी करण्याबाबत तीन आसनी रिक्षा चालक मालक संघटनेसह सावंतवाडी शहर हितवर्धक मंचाचे अध्यक्ष सुरेश भोगटे व वाहनचालकांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदने सादर केली होती. स्पीडब्रेकर न हटविल्यास आठ दिवसानंतर कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचाही इशारा देण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी रिक्षा संघटनेचे सल्लागार सुधीर पराडकर व अध्यक्ष धर्मेंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभागाच्या’ बस स्थानकासमोरील कार्यालयात धडक दिली. यावेळी त्यांनी उपअभियंता वैभव सगरे यांची भेट घेऊन चर्चा केली. मगरे यांनी, ज्या ठिकाणी धोकादायक स्पीडब्रेकरमुळे प्रवाशांना त्रास होतो व वाहनांचे नुकसान होते, तेथील स्पीडब्रेकर समपातळीव आणण्याबाबत येत्या आठ दिवसात उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन दिले.यावेळी रिक्षा संघटनेचे पॅटिंक डिसोजा, संजय गावडे, सुभाष गावडे, बाळू वालावलकर, संतोष केळुसकर, उमेश परब तर शहर हितवर्धक मंचाचे अध्यक्ष सुरेश भोगटे, बावतीस फर्नांडिस, सत्यजीत देशमुख, दीपक सावंत, हर्षवर्धन धारणकर आदी टेम्पो, ट्रक, रिक्षाचालक उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

