कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

तेंडोली परिसरात गवारेड्यांचा धुमाकूळ

*🛑तेंडोली परिसरात गवारेड्यांचा धुमाकूळ*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१६*:-तेंडोली परिसरात सध्या गवारेड्यांनी धुमाकूळ घातला आहे. या भागात सध्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी शेती केली आहे. परंतु वन्यप्राणी मात्र भातशेतीचे नुकसान करीत आहेत. गवारेड्यांच्या कळपाने सध्या शेतकऱ्यांच्या भातशेतीला लक्ष्य केले आहे. तेंडोली-भोमवाडी येथील शेतकरी संतोष तेंडोलकर यांच्या शेतातील शेंगदाणा, मिरची पीक, मका गवारेड्यांनी बुधवारी रात्री खाऊन नुकसान केले.दहा-बारा गवारेड्यांचा कळप शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहे. वनविभागाने या गवारेड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी तेथील शेतकरी करीत आहेत. तेंडोली परिसरात गेली दोन वर्षे गवारेड्यांचा कळप वावरत आहे. पावसाळ्यातही या गवारेड्यांच्या कळपाने शेतीचे नुकसान केले होते. त्यावेळी या गवारेड्यांची संख्या कमी होती. अलीकडेच या गवारेड्यांचा कळप वाढला आहे.
*.. तर आम्ही करायचे तरी काय?*
तेंडोली-भोमवाडी येथील संतोष तेंडोलकर यांनी दीड एकर क्षेत्रात भुईमूग, कुळीथ, मिरची, जनावरांसाठी बाजरी, कडबा, मका यासारखी पिके केली आहेत. मात्र, गवारेड्यांच्या कळपाने एका रात्रीत या भातशेतीचे नुकसान केले. जनावरांसाठी केलेला चारा या गवारेड्यांनी खाऊन अक्षरशः नासधूस केली आहे. एकतर आता उन्हाळ्यात पाण्याची मोठी कमतरता आहे. तेथील शेतकरी ओढ्याच्या पाण्यावर शेती करतात. त्यात असे रानटी प्राणी अशी नासधूस करू लागले, तर आम्ही करायचे तरी काय?, असा सवाल शेतकऱ्यांमधून केला जात आहे. *नुकसान भरपाईची मागणी* काबाडकष्ट करून मेहनतीने तेंडोलकर कुटुंबीय पावसाळी व उन्हाळी शेती करतात. उन्हाळ्यात ते जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात चारा करतात. त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. त्यांनी केलेली शेती पूर्ण वाया गेली आहे. गवारेड्यांना रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडे पर्याय उरलेला नाही. भातशेतीच्या जवळच असलेल्या जंगलात हा गवारेड्यांचा कळप वास्तव्यास आहे, असे तेथील शेतकरी सांगत आहेत. या गवारेड्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकरी दिवस-रात्र फटाके, खेळण्यातील बंदुका दाखवून गवारेड्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेंडोलकर कुटुंबियांचे साधारणतः दहा ते बारा हजार रु. चे नुकसान झाले आहे. वनविभागाने गवारेड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!