बनावट कागदपत्रे बनवून फसवणूकप्रकरणी जामीन
*🛑बनावट कागदपत्रे बनवून फसवणूकप्रकरणी जामीन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१५*:-सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथील जमीन-विक्री प्रकरणामध्ये जमिनीची बनावट कागदपत्रे आणि स्वतः जमीन मालक असल्याचे भासवून वीस लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अक्षय आनंद सावंत (३०, रा. कुंब्रल, ता. दोडामार्ग) याला मंगळवारी सावंतवाडी न्यायालयाने पन्नास हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. संशयितातर्फे अॅड. स्वप्नील कोलगावकर यांनी काम पाहिले.जमिनीची बनावट कागदपत्रे बनवून आपली २० लाखाची फसवणूक केल्याची तक्रार फिर्यादी ज्ञानेश्वर बाळकृष्ण गवळी (रा. आंबेगाव, सावंतवाडी) यांनी सहाजणांविरोधात दाखल केली होती. संशयित अक्षय सावंत, अरुण डॅनी मिरांडासह अन्य चौघे अशा सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा फसवणुकीचा प्रकार १२ मार्च २०२० ते १२ जानेवारी २०२१ या कालावधीत घडला. गुन्हा दाखल केलेल्या संशयितांपैकी अक्षय सावंत याला पोलिसांनी २५ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत होता. न्यायालयात अॅड. कोलगावकर यांनी युक्तिवादात तक्रारदार याने दाखल केलेल्या तक्रारीतील तफावत व तपासिक अधिकारी यांनी केलेला तपास यातील फरक न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. सदर. युक्तिवाद ग्राह्य मानून अक्षय सावंत याला ५० हजार रुपयांच्या सशर्त अटीवर जामीन मंजूर केला. या गुन्ह्यातील अन्य संशयित पाचजणांचा पोलीस शोध घेत आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

