आणखीकोकणमहाराष्ट्रसंपादकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 दिशा चौकेकर हिच्या मृत्यूच्या तपासा बाबत पेडणेकर कुटुंबियांनी उच्च न्यायालयात दाद मागावी..

🛑 शवविच्छेदन अहवालात दिशा चौकेकरच्या मृत्युचे कारण स्पष्ट नाही..

🛑 सुतळी सारखी नायलाॅन दोरी,तीचे तीन तुकडे, गळफास लावलेली उंची पंधरा फूट,पाया खाली वापरलेले टेबल तीन फूट,दिशा चौकेकर पाच फूट चार इंच,पंधरा फूट उंची पर्यंत पोहचलीच कशी?

🛑 गळफास लावला तर रसीचे तीन तुकडे का केले? वरच्या बारला बांधलेला रसीचा भाग कसा कापला?

🛑 वेंगुर्ला पोलिसांचा तपास म्हणजे वेडे होऊन पेढे खाण्याचा प्रकार

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ संपादकीय : सिताराम गावडे

🎴वेंगुर्ला, दि-१५:– डोके फुटून पाच ते सात टाके पडतील एवढी मोठी जखम होऊन सुद्धा त्या जखमेतून रक्त आलेच नाही असा जावई शोध वेंगुर्ला पोलिसांनी लावून दिशा चौकेकर हिच्या घातपाताला आत्महत्येचे लेबल लावून जे कुकर्म केले आहे ते कधीच लपून राहणार नाही, ज्याने कोणी ज्याच्या कोणाच्या दबावाखाली असे कृत्य केले आहे त्याला त्याची जबरी किंमत भविष्यात मोजावी लागेल असा ठाम विश्वास आम्हाला आहे.

दिशा चौकेकर पुर्वा श्रमीची संगीता पेडणेकर हिला गेल्या अनेक वर्षापासून आम्ही प्रत्यक्ष ओळखतो तिने अनेक प्रसंगाला तोंड दिले, मात्र कधी खचून गेली नाही किंवा आत्महत्येचा विचारही तिला स्पर्श करून गेला नाही,असे असताना घरची चांगली परिस्थिती ,विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत असताना आपल्या १४ ते १५ वर्षाच्या मुलाला एकाकी टाकून अचानक आत्महत्येचा निर्णय दिशा चौकेकर घेऊच शकत नाही असे आमचे ठाम मत आहे. जर तिला आत्महत्या करायची होती तर आत्महत्ये पूर्वी ती आपल्या माहेरी सावंतवाडी भटवाडी येथे आली होती ,माहेरी येऊन तिने आपले भाऊ, आई, बहीण, यांच्याशी चांगल्या गप्पागोष्टीही केल्या होत्या, त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर कसलेही दडपण दिसत नव्हते व दुसऱ्या दिवशी ती आपल्या घरी गेली व पुढील दोन दिवसातच तिच्या आत्महत्येची बातमी माहेरी पोहचली तिचे तिच्या नवऱ्यावर, मुलावर नीतांत प्रेम होते आपला संपूर्ण आर्थिक व्यवहार तीने नवऱ्याकडे सांभाळायला दीले होते, नवरा तिचा विश्वासू मित्र ,सहकारी, होता मग आपल्या मृत्यूनंतर आपल्या नवऱ्याला त्रास होऊ नये म्हणून जर तिने आत्महत्या केली असती तर निश्चितच तशी चिठ्ठी लिहून ठेवली असती मात्र असा कोणताही कागदोपत्री पुरावा घटनास्थळावर मिळाला नाही .

तिच्या आत्महत्येची बातमी माहेरी पोहचल्यावर तिचा भाऊ माजी नगरसेवक सुनील पेडणेकर चुलत भाऊ माजी नगरसेवक संजय पेडणेकर पुतण्या प्रथमेश पेडणेकर व माहेरकडची मंडळी वेंगुर्ला येथे पोहचली घटनास्थळावरील वस्तुस्थिती पाहिल्यावर आपल्या बहिणीचा घातपात झाला हा संशय पेडणेकर कुटुंबीयांच्या मनात पक्का झाला, कारण घटनास्थळावर तिला खाली झोपवले होते जेव्हा तिला पंचनामा करताना हलवले तेव्हा डोक्यावरची जखम दिसली तोपर्यंत कोणीही काही बोलले नव्हते ,त्या जखमेबाबत विचारणा केल्यावर तिच्या जावेच्या मुलाने व जावेने आम्ही दोघं तिला फासावरून खाली उतरवत असताना तोल गेल्यामुळे ती खाली पडली व फरशीला आपटून जखम झाली असे सांगितले, मात्र त्या जखमेतून एकही थेंब रक्त आले नव्हते, जवळपास चार इंच लांब व दोन इंच एखाद्या तिश्ण हत्याराने वार करावी अशी ती खोलवर गेलेली जखम होती आणि त्या जखमेतून एकही थेंब रक्त आले नाही हे पोलिसांचे व तिच्या घरातील लोकांचे म्हणणे संशयास्पद व हास्यास्पद होते.

तिने तिच्या आत्महत्ये साठी वापरलेली रस्सी 30 ते 40 किलो वजनाच्या वर भार येऊ शकत नाही ,शिवाय ज्या बारवर दोरीने फास लावला गेला त्या बाराला ऑइल पेंट रंग काढण्यात आला होता तो रंग कुठेही त्या दोरीमुळे खरचटला नाही ,त्यामुळे त्या बारला फास लावलाच नाही हे प्रथम दर्शनी सिद्ध होते,पोलिसांनीही ते माहेरच्या मंडळींचा जबाब घेताना मान्य केले होते.मात्र तपासात त्याचा उल्लेखही केला नाही, पोलीस या घटनेला आत्महत्येचे लेबल का लावू पाहत होते हा मोठा संशोधनाचा विषय होता, कारण ज्या ठिकाणी आत्महत्या झाली असे भासविण्यात आले त्या ठिकाणी भिंतीवर हाताचे ठसे होते, ते ठसे कोणाचे ?कसे आले? याचा तपासही पोलिसांनी केला नाही, शवविच्छेदन गडबडीत करून मृतदेह दहन करण्याचे त्यांचे मनसुबे होते ते सुनील पेडणेकर व त्यांच्या कुटुंबियांमुळे धुळीस मिळाले.

शिकाऊ डॉक्टरांनी माझ्या बहिणीचे पोस्टमार्टम करू नये व ते आम्हाला मान्य नाही असा आक्षेप सुनील पेडणेकर यांनी घेतल्यामुळे तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात आला. कोल्हापूर येथील शवविच्छेदन अहवालात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत व गळ्याला लागलेला फास अशी दोन कारणे नमूद करण्यात आली मात्र नेमक्या कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला याचा उलगडा केला गेला नाही. त्यामुळे एकंदरीत हा संपूर्ण प्रकार संशयास्पद आहे.

गेल्या महिनाभर दिशा चौकेकर हिचे माहेरचे कुटुंब आपल्या मुलीचा घात पात झाला हे टाहो फोडून सांगत असताना सुद्धा सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संस्था , महिला संघटना मूग गिळून गप्प आहेत. या मागचे कारण समजू शकले नाही,दिशा चौकेकर ही पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी होती, एखाद्या महिला शासकीय अधिकाऱ्यांचा मृत्यू अशा प्रकारे घातपाताचा संशय असताना एखादी महिला संघटना पुढे येऊन पोलिसांनी याचा निपक्षपणे तपास करावा अशी मागणी करताना दिसून आली नाही, किंवा दिशा चौकेकर हीच्या मृत्यूची बातमी दुसऱ्या दिवशी कुठेच प्रसिद्ध झाली नाही, तिच्या भावाने याबाबत उठाव केल्यावर काही वृत्तपत्रात याबाबतची बातमी प्रसिद्ध झाली, मात्र दिशा चौकेकर हिचा मृत्यू गळफास लावल्याने झाला असे वेंगुर्ला पोलीस ठामपणे का सांगत नाहीत.आमचे वेंगुर्ला पोलिसांना आवाहन आहे या घटनेच्या मुळाशी जाऊन कोणाच्याही दबावाला, दडपणाला ,बळी न पडता जे प्रत्यक्ष दर्श साक्षीदार आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सत्य वदवून घेतल्यास पडद्या मागचे सत्य समोर येईल.

डोक्यावरील घाव पाहिला असता एखाद्या तिष्ण हत्याराने हल्ला केल्याने झाला असावा असा प्रथमदर्शनी संशय आहे, मात्र पोलिसांनी त्या दृष्टीने कोणताही तपास केला नाही एवढ्या मोठ्या जखमेतून एक थेंबही रक्त आले नाही यावर कोणाचाच विश्वास बसला नाही अगदी डॉक्टर क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या डॉक्टर मित्रानी असे घडणे शक्य नाही असे सांगून यामागे काहीतरी गोलमाल असल्याचे स्पष्ट केले ,यावरून पोलिसांनी दिशा चौकेकर हिचे मृत्यू प्रकरण गांभीर्याने न घेता ते प्रकरण घातपात म्हणून न हाताळता आत्महत्याच आहे असा समज करून घेऊन तसे जबाब घेऊन तपास काम पूर्ण केले असा आमचा आरोप आहे.

या प्रकरणात म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावतोय.असा प्रकार पुन्हा कोणाच्या बाबतीत करून त्याला आत्महत्येचे लेबल लावले जाऊ शकते,आपले महाराष्ट्र राज्य म्हणजे काही बिहार नाही तिथे खुलेआम खून करून ते पचवले जावे येथील जनता सुज्ञ जागरूक आहे त्याने या आत्महत्या प्रकरणी पुढे येऊन वेंगुर्ला पोलिसांना याचा जाब विचारला पाहिजे असे आमचे ठाम मत आहे ,याबाबत पोलिसांनी उचित कारवाई न केल्यास पोलिसां विरोधातच उच्च न्यायालयात जाऊन माहेरच्या लोकांना दाद मागावी लागणार आहे त्या दृष्टीने उच्च न्यायालयाच्या वकिलांशी बोलणे झाले असून कागदपत्रे ,पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे, कोणत्याही परिस्थितीत दिशा चौकेकर हिच्या घातपाताची चौकशी करून दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत पेडणेकर कुटुंबिया स्वस्त बसणार नाहीत एवढे मात्र निश्चत व या घातपाताची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलची रास्त मागणी आहे ,जोपर्यंत या घटनेचा छडा लागत नाही तोपर्यंत कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल दिशा चौकेकर व पेडणेकर कुटुंब यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!