कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

वीज खांब चोरीप्रकरणी ग्रामस्थांनी विचारला अधिकाऱ्यांना जाब

*🛑वीज खांब चोरीप्रकरणी ग्रामस्थांनी विचारला अधिकाऱ्यांना जाब*

*🛑चौकशीनंतर कारवाई करण्याचे आश्वासन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-१३*:-तालुक्यातील तळगाव पेडवेवाडी, खांदवाडी येथे वीज वितरण कंपनीने जुने वीज खांब बदलून तेथे नवीन खांब बसविले. त्यानंतर तेथेच काढून ठेवलेले जुने लोखंडी वीज खांब एका व्यक्तीने आपल्या खासगी वापरासाठी चोरून नेले. हा प्रकार समजताच तळगावातील काही ग्रामस्थांनी वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता म्हात्रे यांच्याकडे तक्रार केली. या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता म्हात्रे हे येथील वीज कार्यालयात आले असता, तळगाव येथील ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन तेथील वीज खांब चोरीबाबत लक्ष बेधले. यावेळी वीज कंपनीचे कट्टा येथील सहाय्यक अभियंता शिंदे, मालवणचे सहाय्यक वीज अभियंता गुरुदास भुजबळ आदी उपस्थित होते. वीज वितरणने तळगाव. पेडवेवाडी येथील जुने जीर्ण खांब बदलून नवीन बसविण्यात आले होते. जुने जीर्ण लोखंडी खांब तेथेच काढून ठेवले होते. मात्र, हे खांब एका व्यक्तीने चोरून आपल्या खासगी कामासाठी वापरल्याची चर्चा आहे. कंपनीच्या ही चोरी निदर्शनास-आणून देऊनही त्याच्यावर कोणतीचे कारवाई झाली नसल्याने तळगाव ग्रामस्थांनी मालवण येथील वीज कंपनीला भेट देत, तेथे उपस्थित- उपकार्यकारी अभियंता म्हात्रे यांचे लक्ष वेधत जाब विचारला. ते खांब त्या व्यक्तीने लपवून ठेवले, असा आरोप ग्रामस्थांनी करत त्या व्यक्तीला अधिकारी पाठिशी घालत. असतील, तर ते चुकीचे आहे, असे सांगितले. या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे वीज कंपनीच्या अधिकारी यांनी यावेळी सांगितले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!