सावंतवाडीत मतदारयादीत मोठ्या प्रमाणात घोळ
*🛑सावंतवाडीत मतदारयादीत मोठ्या प्रमाणात घोळ*
*🛑आई ९१ वर्षीय, तर मुलाचे वय १०३*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१२*:-आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने मतदार यादी अद्यावत करण्यासाठी हरप्रकारचे प्रयत्न केले. परंतु अद्यापही मतदारयादी अद्यावत झालेली नाही. अनेक ठिकाणी मतदारांच्या वयाबाबत घोळ झालेला दिसतो. तसेच मृत व्यक्तींचे नाव पुन्हा मतदारयादीत दिसत आहे. यासंदर्भात निवडणूक विभागाला कळूनही त्यांच्याकडून दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे मतदारात नाराजी व्यक्त होत आहे.सावंतवाडी तालुक्याच्या मतदारयादीत एका महिलेचे वय १२० वर्षे दाखविण्यात आले. परंतु प्रत्यक्षात या महिलेचे वय ३५ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. तसेच सावंतवाडी महादेवाचे भाटले येथील चंद्रकांत नागेश देशपांडे या मतदाराचे वय १०३ वर्षे – दाखवण्यात आले आहे. तर त्यांच्या आई अन्नपूर्णा देशपांडे यांचे वय ९१ वर्षे नमूद आहे. प्रत्यक्षात आईचे निधन चार वर्षापूर्वी झाले होते. या संदर्भात देशपांडे यांनी निवडणूक विभागाला वेळोवेळी कळवूही निवडणूक विभागाने दुरुस्ती केलेली नाही. या संदर्भात देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.निवडणूक विभाग मतदारयादी वेळोवेळी अद्ययावत करते. पत्ता बदललेल्या, नवीन मतदार, निधन झालेल्या मतदाराचे नाव वगळण्याबाबत निवडणूक विभाग वेळोवेळी दुरुस्ती करत असते. या संदर्भात जनजागृतीवर खर्चही करण्यात येतो. परंतु एवढा खर्च करूनही घोळ कायम असतो. त्यामुळे मतदार मतदानापासून वंचित राहतात. वयाबाबत मतदानावेळी आक्षेप घेतला जाऊ शकतो. त्यामुळे मतदार मतदाना पासून वंचित राहू शकतात. त्यामुळे या संदर्भात निवडणूक विभागाने लक्ष देऊन उपाययोजना केल्या पाहिजेत. अन्यथा मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

