जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे पगार रखडले
*🛑जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे पगार रखडले*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-०९*:-कोषागार कार्यालयाच्या इ-कुबेर प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने जि. प. कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. संबंधित देयकांची बीडीएसची मुदत संपल्याने ही देयके परत करण्यात आली असून ती पुन्हा सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षक व अन्य काही कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी पेड इन मार्च पगारासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शासनाच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार जिल्हा कोषागार कार्यालयाच्या मान्यतेनंतर दिले जातात. त्यामुळे सर्व विभाग आपल्या कर्मचाऱ्यांची वेतन देयके साधारणतः दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोषागार कार्यालयात सादर करतात. जिल्हा परिषदेच्या काही विभागांनी ती सादर केली होती. मात्र २६ फेब्रुवारीपासून कोषागार कार्यालयाच्या E-KUBER या प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने ही प्रणाली देयके स्वीकारू शकत नव्हती. त्यामुळे या कार्यालयात सादर झालेली देयके बरेच दिवस प्रलंबित राहिली होती. नव्याने निर्माण झालेली तांत्रिक समस्या दूर करण्यासांठी चार ते पाच दिवस लोटल्याने जि. प. कडून सादर करण्यात आलेल्या काही विभागांच्या देयाकांची बीडीएसची मुदतही संपली. आता पगार खात्यावर जमा होण्यासाठी आणखी आठवडा जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत जिल्हा कोषागार अधिकारी मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता कोषागार कार्यालयाची e-kuber ही प्रणाली तांत्रिक बिघाडामुळे काही दिवस बंद होती, या बाबीला त्यांनी दुजोरा दिला असून ती आता पूर्ववत झाली असल्याचे ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. तसेच आता ऑनलाईन प्रणाली असल्याने सॉफ्टवेअरकडून एकदा रिजेक्ट झालेले काम दुरुस्त झाल्याशिवाय पुढील देयके स्वीकारली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

