एस्.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर कामगार सेनेची परिवहन मंत्र्यांसोबत बैठक संपन्न..
▪️एस्.टी. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नांवर कामगार सेनेशी परिवहन मंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.२६: महाराष्ट्र एस्.टी. कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते तथा पक्ष प्रवक्ते खा. अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सरचिटणीस हिरेनजी रेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एस्.टी. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी परिवहन मंत्री ना. अॅड. अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र एस्.टी. कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांनी इतिहासात पहिल्यांदाच एस्.टी. कर्मचाऱ्यांच्या नियमीत वेतनासाठी एस्.टी. महामंडळाला कोणत्याही प्रतिपुर्ती शिवाय १००० कोटींचे आर्थिक पॅकेज दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचे आभार मानले. तर १ हजार कोटींचे पॅकेज मिळवण्यासाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांचे विशेष आभार मानले आहेत.
यावेळी कोषाध्यक्ष राजेंद्र मोजाड, निवासी सचिव नारायण उतेकर, महिला संघटक सौ. स्मिता पत्की, कार्यालय प्रमुख रविंद्र चिपळूण सह कोषाध्यक्ष प्रमोद मिस्त्री उपस्थित होते.
महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने वेळोवेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच परिवहन मंत्री ना. अॅड अनिल परब यांना दिलेल्या पत्रावर चर्चा करण्यासाठी पत्र देऊन वेळ मागीतली होती. त्याअनुशंगाने परिवहन मंत्र्यांनी आज महाराष्ट्र एसटी कामगार सेनेला पाचारण करुन बैठक आयोजित केली. या बैठकीत एसटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर मॅरेथॉन चर्चा झाली.
१) एसटी प्रशासनाने लागु केलेली स्वेच्छा सेवा निवृत्त योजना कर्मचाऱ्यांना लाभदायक नसल्याने ९० दिवसा ऐवजी १८० दिवस लाभ देण्यात यावा, योजनेला मुदतवाढ मिळावी, मिळणारी सर्व रक्कम एकरकमी देवुन गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता इतर सर्व गुन्हे सक्ती ताकिदवर निकाली काढावे तसेच स्वेच्छा निवृत्ती स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना महामंडळामध्ये नियुक्ती कशा प्रकारे देण्यात येइल या बाबत प्रशासनाशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री यांनी स्पष्ट केले.
२) अपहार प्रकरणात वाहकांच्या बदल्याबाबत FNC प्रकरणातील अनियमितेची चौकशी करुन अन्याय कारक बदल्या रद् करण्याचे परिवहन मंत्र्यांनी मान्य केले.
३) सुधारित शिस्त व आवेदन कार्यपद्धतीतील त्रुटी दूर करुन एखाद्या अपराध प्रकरणात सक्षम प्राधीकाऱ्याने दोषी ठरवले परंतु न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले व या एसटी प्रशासनासोबत चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्याचे मंत्री यांनी मान्य केले.
४) एसटी चालकांना परवाना नुतनीकरण करण्यासाठी खाजगी प्रशिक्षण केंद्राऐवजी महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्रातर्फे दाखला देवुन चालक परवाना नुतनीकरण करण्याच्या संबंधित विभागांना त्वरित सुचना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
५) नादुरुस्त ETIM मशीन प्रकरणाची चौकशी करुन वाहकांकडून चुकीच्या पद्धतीने वसुली केलेली पैसे ट्रायमेक्स कंपनी कडुन वाहकांना परत देण्याचे मान्य केले व नविन निविदा मागविण्याचे संकेत दिले.
६) एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना मिळणारा मोफत पास शयनयान (स्लीपर कोच) वाहनांमध्ये मर्यादीत आसने आरक्षित ठेवून ग्राह्य धरण्यास मान्यता देण्यात आली.
७) ३०० रुपये प्रोत्साहन भत्त्याची अनिश्चितता दुर करुन नियमानुसार सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना अदा करण्याचे त्वरित आदेश देण्यात येतील याबाबत कोणीही वंचित राहणार नसल्याचे स्पष्ट केले.
८) शासन निर्णयाप्रमाणे ऑन ड्युटी कोविड ची लागण झाली असेल तर कोविड विशेष रजा मंजूर करण्यास मान्यता दिली.
९) ५० लाख विम्या बाबतची अनियमितता दूर करून शासनाच्या नियमावली नुसार कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याचे मान्य केले..
१०) कोविड आजाराच्या वैद्यकिय बिलांची प्रतिपुर्तीसाठी शासनाच्या नियमांप्रमाणे गंभीर आजारात समाविष्ट करुन ९-८७ भाग १ मध्ये समाविष्ट करण्यास त्वरित मान्यता दिली.
११) विद्युत घाटावर चालणाऱ्या वाहनांचे चार्जीग स्टेशन सोबतच CNG, LNG पंप महामंडळामार्फत लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
१२) मालवाहतूकी बाबत च्या सर्व तक्रारीचे निवारण करुन शासकीय उपक्रमाची माल वाहतूक एसटी महामंडळाला लवकरच मिळून देण्यात येणार असल्याचे मान्य केले.
१३) संगणकीय ड्युटी आलोकेशनची कार्यप्रणाली राबविण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असुन लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
१४) उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता (इन्सेटीव्ह) बाबत स्वतः मंत्री महोदयांच्याही विचाराधीन असलेली योजना आगारातील वाहतुक कर्मचारी व वाहतूकीशी निगडीत कर्मचाऱ्यांना लागु त्वरित लागु करण्याचे मान्य केले..
१५) कै. मनोज चौधरी आत्महत्या प्रकरणात चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मान्य केले..
१६) सातव्या वेतन आयोगानुसार राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे व वार्षिक वेतनवाढ यातील तफावत दूर करुन रखडलेला ५ टक्के महागाईभत्ता लागु करण्याबाबत प्रशासनाशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे मान्य केले.
इत्यादी कामगार सेनेने पत्राद्वारे सूचविलेल्या मुद्दांवर मॅरेथॉन चर्चा झाली. वरिल सर्व एकुण एक कामगार हिताच्या मुद्द्यांना परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी थेट मान्यता दिली. तसेच वैद्यकिय बिलांच्या प्रतिपुर्ती ऐवजी मेडिक्लेम योजना एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना लागु करण्याबाबत प्राथमिक स्वरुपाची चर्चा ही यावेळी करण्यात आली आहे.
सांगली सातारा व कोल्हापूर विभागात अतिरिक्तच्या नावाखाली अन्याय कारक बदल्या व सेवा स्थगिती झालेल्या लिपीक टंकलेखक पदाच्या कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांची महाराष्ट्र एसटी कामगार सेने समवेत भेट घेवुन अन्यायकारक झालेल्या बदल्या रद्द करुन सेवा स्थगिती उठविण्यासाठी संयुक्त निवेदन दिले.
महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेनजी रेडकर यांनी सांगली, सातारा व कोल्हापूर वगळता इतर कोणत्याही विभागात असा प्रकार घडलेला नसतांना फक्त या तीनच विभागात हा प्रकार घडल्याचे व ऐन कोरोना संसर्गाचा प्रसार राज्यात थैमान घालत होता. त्याच वेळी या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्यामुळे मानुसकीला काळीमा फासणारी घटना या तीन विभागात घडल्याचे परिवहनमंत्री यांच्या निदर्शनास आणुन दिले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशीचे आदेश देवुन लवकरच न्याय देण्याचे यावेळी परिवहन मंत्र्यांनी मान्य केले. त्यामुळे सांगली, सातारा व कोल्हापूर विभागातून आलेल्या कर्मचाऱ्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. याबाबतची माहिती कामगार सेना विभागीय सचिव आबा धुरी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
महेश तावडे, अनुप नाईक तसेच कर्मचारी प्रश्नासाठी नेहमी न्याय देणारे कामगार सेना अध्यक्ष खासदार अरविंद सावंत तसेच सरचिटणीस हिरेनजी रेडकर कामगार प्रश्ननी न्याय दिल्याबाबत रा. प. सिंधुदुर्ग विभागातील कामगार सेना पदाधिकारी, सभासद तसेच सर्व एस. टी. कर्मचाऱ्यांनी याबाबत आभार व्यक्त केले.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_